लोकमंगलचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

लोकमंगलचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर सोलापूर : लोकमंगल वाचनालयाच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे राज्यस्तरीय सहित्य पुरसकारांची घोषणा मंगळवार

What the world would be like if medicine shops didn’t exist
Why your weather channel never works out the way you plan
The unconventional guide to world markets

लोकमंगलचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

सोलापूर : लोकमंगल वाचनालयाच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे राज्यस्तरीय सहित्य पुरसकारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली.
यंदाच्या वर्षी विजेने चोरलेले दिवस-कादंबरी-संतोष जगताप – दर्या प्रकाशन, पुणे, क्लोज एन्काऊंटर्स – ललित – पुरुषोत्तम बेर्डे – राजहंस प्रकाशक, पुणे, सिनेमा पाहणारा माणूस – आत्मचरित्र – अशोक राणे – संधिकाल प्रकाशन, मुंबई तर साहित्य क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल व्यक्ती किंवा संस्थेला देण्यात येणारा पुरस्कार यंदा मराठी अभ्यास परिषदेच्या ‘भाषा आणि जीवन’ या त्रैमासिकासाठी देण्यात येत आहे.
दरम्यान, यावर्षीपासून दर दोन वर्षांनी लोकमंगल परिवाराच्या वतीने नवोदित लेखक, कवींसाठी प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार आहे. यंदाचा पुरस्कार डॉ. शिवाजी नारायणराव शिंदे, सोलापूर यांच्या ‘कैवार’, शब्दशिवार प्रकाशन, मंगळवेढा या काव्यसंग्रहास देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे लवकरच वितरण करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
यापूर्वी हा पुरस्कार नंदा खरे, सुहास बहुळकर, सुधीर रसाळ, आनंद कुंभार, प्रवीण बांदेकर, श्रीकांत देशमुख, सई परांजपे, गोपाळराव देशमुख, मकरंद साठे, गणेश मतकरी, मंगेश काळे, राजीव नाईक, ऋषिकेश गुप्ते, प्रफुल्ल शिलेदार, प्रा. द. तु. पाटील, शर्मिला फडके, विश्राम गुप्ते, मराठी भाषा आणि संशोधन मंडळाच्या मराठी संशोधन पत्रिका यांना देण्यात आलेला आहे. लवकरच प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
पुरस्कार निवड समितीचे सदस्य शिरीष देखणे, राज काझी (पुणे), नितीन वैद्य आणि प्रा. डॉ. ऋचा कांबळे हे होते. या पुरस्कारासाठी समन्वयक म्हणून शोभा बोल्ली यांनी काम पाहिले आहे.

COMMENTS