सोलापूरच्या चार हुतात्म्यांना  पोस्ट खात्याची मानवंदना

सोलापूरच्या चार हुतात्म्यांना  पोस्ट खात्याची मानवंदना सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या प्रयत्नाला यश सोलापूर (प्रतिनिधी) सोलापूरमधील चार हुतात्मा हे सो

Why your weather channel never works out the way you plan
Why mom was right about cool tech gadgets
How landscape architectures can help you predict the future

सोलापूरच्या चार हुतात्म्यांना  पोस्ट खात्याची मानवंदना

सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या प्रयत्नाला यश
सोलापूर (प्रतिनिधी)
सोलापूरमधील चार हुतात्मा हे सोलापूर जिल्ह्याचा मान आहेत. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे योगदान हा सर्व सोलापूरकरांसाठी अभिमानाचा विषय आहे. त्यांच्या सन्मानार्थ भारतीय पोस्ट खात्यातर्फे तिकीट प्रकाशित करण्यात यावे, अशी
संकल्पना २०१६ मध्ये तत्कालीन सहकार मंत्री व सोलापूर सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, आ. सुभाष  देशमुख यांनी मांडली.  यासाठी त्यांनी कायम पाठपुरावा केला. अखेर त्याला यश आले असून    १२ जानेवारी रोजी या चार हुतात्म्यांच्या ९० व्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची महती सांगणाऱ्या तिकिटाच्या छपाईचा निर्णय पोस्टाने  घेतला आहे.
सोलापूरच्या चार हुतात्म्यांची महती महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचविण्यासाठी पोस्टाने त्यांचे तिकीट करावे यासाठी आ. देशमुख यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री  मनोज सिन्हा यांना ऑक्टोबर २०१६ रोजी  पहिले पत्र पाठविले. या पत्राची व मागणीची दाखल घेतली गेली व डिसेंबर २०१६ मध्ये  सिन्हा यांच्याकडून कार्यवाही सुरू करत असल्याचे उत्तरही मिळाले. यापुढच्या कालावधीतील शासकीय प्रक्रिया व कार्यपद्धतीनुसार आवश्यक असणारी कागदपत्रे व माहिती पुरविण्यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशनने वेळोवेळी प्रयत्न केले. त्यानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये विद्यमान केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांना आ. देशमुख यांनी पत्र पाठवून व प्रत्यक्ष भेटून या मागणीचा पुन्हा पाठपुरावा केला. अखेर त्याला यश आले आहे.

चौकट
सोलापूरकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट: आ. देशमुख
सोलापूरची महती, सोलापूरचे देशाच्या इतिहासातील योगदान, सोलापूरची वैशिष्ट्ये यांना प्रसिद्धी व मान मिळावा हा सोलापूर सोशल फाऊंडेशनचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. १२ जानेवारी रोजी या हुतात्म्यांच्या ९० व्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर  त्यांच्या सन्मानार्थ भारतीय पोस्ट खात्यातर्फे तिकीट प्रकाशित करण्यात यावे, ही बातमी सर्व सोलापूरकरांसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे, असे आ. सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे.

COMMENTS