पराभवाची नैतिकता स्वीकारू  मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा: आ. सुभाष देशमुख

पराभवाची नैतिकता स्वीकारू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा: आ. सुभाष देशमुख

पराभवाची नैतिकता स्वीकारू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा: आ. सुभाष देशमुख शिवसेनेचीच जास्त मते फुटल्याचा केला दावा सोलापूर : विधान परिषद निवडण

पराभवाची नैतिकता स्वीकारू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा: आ. सुभाष देशमुख

शिवसेनेचीच जास्त मते फुटल्याचा केला दावा

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला. याचे संपूर्ण श्रेय फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाबद्दल आमदारांच्या मनात नाराजी होती ती मतांच्या रूपाने बाहेर आली आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी केले आहे. राष्ट्रवादीने पद्धतशीरपणे शिवसेना आणि काँग्रेसचा गेम केल्याची टीकाही आमदार देशमुख यांनी केली.
राज्यसभा पाठोपाठ विधानपरिषदेत विजय मिळवून देवेंद्र फडणवीस यांनी आपले नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे सध्या राज्यात त्यांच्यासारखा रणनीतीकार कोणीही नाही. मोदी यांच्या रूपाने श्रीकृष्ण तर आमच्या सोबत आहेत आता फडणवीस यांच्या रूपाने अर्जुनही मिळालेला आहे . फडणवीस यांच्याकडे जसे नेतृत्व गुण आहेत ते शिवसेनेकडे नाहीत. मुख्यमंत्री असूनही उध्वव ठाकरे आपल्याच पक्षातील आमदारांना भेटत नव्हते, त्यांची कामे करत नव्हते. त्यांना निधी देत नव्हते त्यामुळे मुख्यमंत्र्यांबद्दल आमदारांमध्ये नाराजी होती तीच नाराजी विधान परिषद निवडणुकीत मतांमधून समोर आली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने आपला कोटा वाढवला आणि काही सेनेची इतर काही काँग्रेसची मते आपल्याकडे वळवली. त्यांनी पद्धतशीरपणे काँग्रेस आणि शिवसेनेचा गेम केला आता तरी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचा डाव समजून घेऊन आणि पराभवाची नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यावा.
विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेसोबत असलेल्या पक्षांनी त्यांना मतदान केले मात्र शिवसेनेतील अंतर्गत नाराज असलेल्या आमदारांनी शिवसेनेला मतदान केले नाही हे आता एकनाथ शिंदे यांच्या प्रकरणावरून सिद्ध होत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले सर्व आमदार कट्टर शिवसैनिक आहेत त्यांना भाजप पासून सेनेने घेतलेला काडीमोड पटलेला नाही त्यांची नाराजी आज ना उद्या बाहेर येणार होत. ती विधान परिषद निवडणुकीनंतर सर्वांसमोर आली आहे.
एकनाथ खडसे कितीही बोलत असले तरी भाजपचे एकही मत फुटलेले नाही. भाजपचा प्रत्येक आमदार पक्षाला मानतो त्यामुळे भाजपच्या सर्व आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले आहे, असेही आमदार देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.
चौकट
महापालिका, जिल्हा परिषद सहज जिंकू
सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी ठिकाण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली आहॆ. राज्यसभा आणि विधान परिषदेत त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुशल नेतृत्वाने विजय मिळवला आहे त्याच पद्धतीने सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेतही भाजप सहज विजय मिळवेल, असेही यावेळी आमदार देशमुख म्हणाले.
चौकट
काँग्रेसचा निषेध करावा तेवढा कमीच
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी आजारी असतानाही मतदान करून सर्वांसमोर पक्ष निष्ठेचे उदाहरण ठेवले आहे असे असताना काँग्रेस नेत्यांनी दोघांच्या मतांवर आक्षेप नोंदवत खालच्या पातळीचे राजकारण केले आहे त्यामुळे काँग्रेसचा निषेध करावा तेवढा कमीच असल्याचे आमदार देशमुख म्हणाले.
चौकट
फडणवीस काहीही करू शकतात
राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत भाजपकडे संख्याबळ नसतानाही देवेंद्र फडणीस यांनी योग्य नियोजन करून विजय मिळवल. सध्या राज्यात सत्ता परिवर्तनाची चर्चा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मनात आणले तर ते काहीही करू शकतात , असे सूचक वक्तव्य ही आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी केले.

COMMENTS