शहर-जिल्ह्यात धान्य पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश आ. सुभाष देशमुख यांच्या मागणीची दखल

शहर-जिल्ह्यात धान्य पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश आ. सुभाष देशमुख यांच्या मागणीची दखल सोलापूर (प्रतिनिधी) आ. सुभाष देशमुख यांच्या  मागणीची दखल घे

शहर-जिल्ह्यात धान्य पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश

आ. सुभाष देशमुख यांच्या मागणीची दखल

सोलापूर (प्रतिनिधी)
आ. सुभाष देशमुख यांच्या  मागणीची दखल घेत अन्न व पुरवठा विभागाने रेशन दुकानदार संघटनेच्या मागण्यांबाबत विचार करून त्यांना नागरिकांना अन्न धान्य पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश द्यावेत, असे निर्देेश जिल्हा पुरवठा विभागाला दिले आहेत. याचा अहवाल तत्काळ पाठवावा, असे आदेशात म्हटले आहे.
कोरोना काळात सरकारच्या वतीने रेशन धान्य दुकानदारांच्या मार्फत रेशन कार्डधारकांना मोफत धान्यपुरवठा करण्याचे जाहीर केले आहे. मात्र शहर आणि जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारात धान्य वाटप बंद केले आहे. त्यामुळे  धान्य वाटप थांववले आहे. त्यामुळे सामान्य जनतेची  उपासमार होत होत आहे. याबाबत आ. सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे याची कल्पना देत रेशन दुकानदार संघटनेच्या मागण्या मान्य करून दुकाने सुरू करून  जनतेला धान्य पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी दिली होती.  मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अन्नपुरवठा विभागाने आ. देशमुख यांच्या मागणीची दखल घेत रेशन दुकानदार संघटनेच्या मागण्यांबाबत विचार करून  धान्य पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश द्यावेत, असे निर्देेश जिल्हा पुरवठा विभागाला दिले आहेत.

COMMENTS