विद्यार्थी मदत योजनेची साखळी पुढे सुरू यशवंत म्हमाणेची कृतज्ञता देेणगी 

विद्यार्थी मदत योजनेची साखळी पुढे सुरू यशवंत म्हमाणेची कृतज्ञता देेणगी सोलापूर - लोकमंगल प्रतिष्ठानच्या लोटस योजनेतून मदत घेऊन शिक्षण पूर्ण करणार्‍

विद्यार्थी मदत योजनेची साखळी पुढे सुरू
यशवंत म्हमाणेची कृतज्ञता देेणगी
सोलापूर – लोकमंगल प्रतिष्ठानच्या लोटस योजनेतून मदत घेऊन शिक्षण पूर्ण करणार्‍या आणि चांगली कमायी करणार्‍या यशस्वी विद्यार्थ्यांनी परतफेड करण्याच्या भावनेतून एखाद्या मुलाला मदत केली तर या योजनेची साखळी कायम राहून कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही असे मनोगत यशवंत मनोज व्हनमाने यांनी व्यक्त केले.
यशवंत म्हमाणे हे बाळे येथील राहणारे आहेत. त्यांना घरच्या गरिबीमुळे अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण घेणे अशक्य होते. पण दहावीला टेक्निकल विषय होता आणि ८७ टक्के गुण होते. त्यामुळे आपण इंजिनियर व्हावे असे वाटत होते. मात्र ऐपत नव्हती.
याच काळात त्यांना लोकमंगलच्या लोटस योजनेची माहिती मिळाली. या योजनेतून काही मदत मिळाली तर शिक्षणातले अडथळे थोडे तरी दूर होतील या विचाराने लोकमंगलचे प्रणेते आमदार सुभाष बापू देशमुख यांची भेट घेऊन मदतीची मागणी केली. त्यांनी तीन वर्षात ३७ हजारांची मदत केली म्हणून म्हमाणे यांना डिप्लोमाचे शिक्षण शक्य झाले.
आता त्यांना या जोरावर टाटा मोटार्समध्ये नोकरी लागली आहेे. मात्र वेतन चांगले मिळत असूनही त्यांनी अभियांत्रिकीच्या पदवीचेही शिक्षण सुरू ठेवले आह. आपल्याला लोटसमधून मदत मिळाली म्हणून आपल्याला हे दिवस दिसले. आता आपल्या हातात चार पैसे आहेत तेव्हा आपणही आपल्या परीने कोणातरी गरीब विद्यार्थ्याला मदत द्यावी म्हणून त्यांंनी लोटस योजनेला पैसे दिले आहेत.
अशा लोकांनी लोटसला मदत दिली तर विद्यार्थी मदतीची साखळी कायम राहील आणि वरचेवर शिक्षण महाग होत असलेल्या या दिवसांत गरीब विद्यार्थी शिकू शकतील. असे मनोगत म्हमाणे यांनी व्यक्त केले.
त्यांनी आपली देणगी मा. आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या हाती सोपवली. यावेळी लोकमंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहन भैय्या देशमुख आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS