विकासकामे करताना भेदभाव करणार नाही: आमदार सुभाष देशमुख डोणगाव- तेलगाव रस्त्याचे भूमिपूजन

विकासकामे करताना भेदभाव करणार नाही: आमदार सुभाष देशमुख डोणगाव- तेलगाव रस्त्याचे भूमिपूजन सोलापूर (प्रतिनिधी) जनतेने आपल्याला कामे करण्यासाठी

सीतामाई तलावाचा पर्यटनस्थळ म्हणून करावाः आ. सुभाष देशमुख
मराठा आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्याचाच, आ. सुभाष बापू देशमुख यांचे प्रतिपादन
पदवीधर शिक्षक उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार देशमुख यांच्या सातारा, कोल्हापूर येथे बैठका

विकासकामे करताना भेदभाव करणार नाही: आमदार सुभाष देशमुख

डोणगाव- तेलगाव रस्त्याचे भूमिपूजन

सोलापूर (प्रतिनिधी)

जनतेने आपल्याला कामे करण्यासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे विकासाची कामे करताना कोणताही भेदभाव केला नाही आणि करणारही नाही, असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
2 कोटी 50 लाखांच्या डोणगाव तेलगाव रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन डोणगाव येथे  आ. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बाजार समिती संचालक आप्पासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम, डोणगावचे सरपंच संजय भोसले, तेलगावचे सरपंच रेवणसिद्ध पुजारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार देशमुख पुढे म्हणाले की, आत्तापर्यंत कधीही न झालेली कामे गेल्या पाच ते सहा वर्षांत दक्षिण आणि उत्तर तालुक्यात झालेली आहेत. जनतेच्या सेवेची कामे करताना आपण कधीही पक्ष, गट तट पाहिलेले नाही. तालुक्याचा विकास हेच ध्येय ठेवून काम केले आहे आणि यापुढेही करणार आहे.
यावेळी भाजपा महिला तालुका अध्यक्ष जयश्री चौगुले, उपअभियंता बांधकाम विभाग जेऊरकर, विशाल जाधव, नागनाथ बचुटे, विकास पाटील, बाबा आमले, रेवणसिद्ध खजुरकर, ज्ञानेश्वर बंडगर,  व डोणगाव व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS