लोटसतर्फे 22 विद्यार्थांना शिक्षणासाठी मदत रोहन देशमुख यांच्या हस्ते धनादेश वितरीत

लोटसतर्फे  22 विद्यार्थांना शिक्षणासाठी मदत रोहन देशमुख यांच्या हस्ते धनादेश वितरीत सोलापूर (प्रतिनिधी) लोकमंगल फाऊंडेशन संचलित लोटस या शैक्षणि

लोकमंगल बँकेची लॉकडाऊनग्रस्त व्यावसायिकांना २ कोटीची मदत
ति-हे येथील पूरग्रस्त ग्रामस्थांची लोकमंगल बँकेत राहण्याची सोय
लोकमंगल’च्या  शिक्षकरत्न पुरस्काराचे थाटात वितरण  

लोटसतर्फे  22 विद्यार्थांना शिक्षणासाठी मदत

रोहन देशमुख यांच्या हस्ते धनादेश वितरीत

सोलापूर (प्रतिनिधी)
लोकमंगल फाऊंडेशन संचलित लोटस या शैक्षणिक अर्थसहाय्य करणार्‍या विभागामधून एकूण 22 विद्यार्थांना शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसहाय्य करण्यात आले.   लोकमंगल फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी देशमुख यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात शिक्षणाला प्रथम प्राधान्य द्यावे, वेळेचा सदुपयोग करावा, व्यसनाच्या आहारी जाऊ नये, असे सल्ला देत कोणाचेही शिक्षण पैशासाठी अर्धवट राहू नये यासाठी लोटसतर्फे कायम मदत करण्यात येईल याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,  असे आवाहन केले. यावेळी सुधीर ननवरे,   व्ही.पी. मोरे, डॉ. प्रविण ननवरे यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

COMMENTS