लोकमंगल समूह शहर-जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध: आ. सुभाष देशमुख रौप्यमहोत्सवी वर्षाची पदयात्रेने सुरुवात सोलापूर - लोकमंगल समूह आपला रौप्य महो
लोकमंगल समूह शहर-जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध: आ. सुभाष देशमुख
रौप्यमहोत्सवी वर्षाची पदयात्रेने सुरुवात
सोलापूर – लोकमंगल समूह आपला रौप्य महोत्सव साजरा करीत असतानाच सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पण भावनेने काम करण्यास वचनबद्ध आहे, अशी ग्वाही लोकमंगलचे प्रणेते आमदार सुभाष देशमुख यांनी दिली. लोकमंगलच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कर्मचारी मेळाव्यात ते बोलत होते.
1998 साली अक्षय्य तृतियेला स्थापन झालेला लोकमंगल समूह आता रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. या निमित्ताने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार अरविंद जेोशी हे उपस्थित होते.
लोकमंगलने व्यवसाय केला, आर्थिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या बँक, मल्टीस्टेट आणि पतसंस्था अशा संस्था काढून त्याही नावारूपाला आणल्या. ही सगळी कामे अधिक यशस्वी व्हावीत म्हणून आपल्याला काम करायचेच आहे पण सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करताना आपल्याला आपल्या संस्थेच्या स्थापनेमागे असलेल्या सामाजिक उद्दिष्टाचेही भान ठेवायचे आहे असे आ. देशमुख म्हणाले. वृक्षारोपण, अन्नदान, शिक्षण, उद्योजकता, कृषि, आरोग्य, साहित्य अशा अनेक क्षेत्रात आपण कार्यरत आहोत आणि आपल्याला आता अधिक जोमाने कार्यरत व्हायचे आहे , असे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अरविंद जोशी यांनी, लोकमंगलने जीवनाच्या विविध क्षेत्रातल्या तज्ञांना पाचारण करून जिल्ह्याच्या आगामी 25 वर्षांच्या विकासाची दिशा ठरवावी असे प्रतिपादन केले.
या मेळाव्याच्या आधी कर्मचारी आणि पदाधिकारी यांची सात रस्त्यापासून विकासनगर पर्यंत पायी रॅली काढण्यात आली. मेळाव्यात प्राचार्य श्रीकांत धारूरकर यांनी 25 वर्षांतल्या कार्याचा आढावा सादर केला. या कार्यक्रमाला मनीष देशमुख, प्रशांत पाटील, पराग पाटील, डॉ. अनिता ढोबळे, अलका देवडकर, अनीता जगदाळे, राजेशसिंग बायस, हरिश्चंद्र गवळी, शशी थोरात आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूसंचालन डॉ. किरण जगताप यांनी केले. याच कार्यक्रमात लोकमंगल गीताचे अनावरण करण्यात आले. हे गीत सागर अचलकर यांनी लिहिले असून निखील भालेराव यांनी संगीतबद्ध केले आहे.
COMMENTS