वडाळा गाव विद्येच माहेर घर होतेय : रोहन देशमुख

वडाळा गाव विद्येच माहेर घर होतेय : रोहन देशमुख

वडाळा गाव विद्येच माहेर घर होतेय : रोहन देशमुख लोकमंगल महाविद्यालय तर्फे १० वी १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव वडाळा: श्रीराम ग्रामीण

वडाळा गाव विद्येच माहेर घर होतेय : रोहन देशमुख

लोकमंगल महाविद्यालय तर्फे १० वी १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

वडाळा: श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचालित लोकमंगल महाविद्यालयांच्यावतीने १० वी १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित केला होता . सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रोहन देशमुख हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक नेते श्री रामराव जगदाळे तसेच लोकमंगल महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा सोलापूरचे उपजिल्हाधिकारी श्री अजिंक्य गोडगे हे उपस्थित होते. लोकमंगल समूह नेहमीच गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. प्रमुख अतिथी रामराव जगदाळे म्हणाले कि, भारताचा सुजाण नागरिक होण्यासाठी उच्च शिक्षण घ्या. परिस्थिती शिक्षण घेत असताना अडथळा होऊ नये यासाठी लोकमंगल समूह नेहमीच शिष्यवृत्ती च्या माध्यमातून विद्यार्थ्याना मदत करीत आला आहे. श्री अजिंक्य गोडगे म्हणले कि विद्यार्थ्यांनी सातत्य व चिकाटी ठेऊन परिस्थितीशी झुंज दिली पाहिजे. भविष्य घडविण्यासाठी निरोगी आणि निर्व्यसनी राहणे हि काळाची गरज असल्याचे मत त्यांनी प्रतिपादित केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रोहन देशमुख म्हणाले कि मुलांनी उंच स्वप्न पाहावी तसेच आई वडिलांची मन उंचावेल अशी नेत्रदीपक कामगिरी करावी. त्यासाठी प्रयत्न करा यश नक्कीच मिळेल. सदर कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातून २६७ विद्यार्थी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देण्यात अली. आज संस्थेत विद्यार्थ्यांसाठी कृषी, उदयोजकता, जैवतंत्रज्ञान , फार्मसी , शाळा , कनिष्ठ महाविद्यालय , वाणिज्य शाखा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदी विभाग आहेत ज्यातून शिक्षण दिले जात आहे.
या कार्यक्रमास संस्थेचे मार्गदर्शक बॉबी मेनन प्राचार्य डॉ सतीश देवकर,प्राचार्य योगेश गायकवाड प्राचार्य रोहित माने श्री गोकुळ यादव प्रा कविता संभारंभ सौ अश्विनी टोणपे श्री दीपक कापसे नफिसा तांबोळी हे उपस्थिती होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्रीकांत धारूरकर यांनी तर सूत्रसंचालन डॉ किरण जगताप यांनी केले.

COMMENTS