“लोकमंगल महाविद्यालयात जागतिक मृदा दिन साजरा”

“लोकमंगल महाविद्यालयात जागतिक मृदा दिन साजरा”

श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान वडाळा संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत लोकमंगल कृषी व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय

श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान वडाळा संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत लोकमंगल कृषी व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात जागतिक मृदा दिन कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने दि.5 डिसेंबर 2021 रोजी 4.00 ते 5.00 या वेळेत संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजीत पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रासेयो स्वयंसेविका वैष्णवी गव्हाणे, ऋतुजा सलगर व ऋषिकेश फडके यांनी जागतिक मृदा दिनाबद्दल आपले मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये मृदा दिन का साजरा केला जातो मृदा दिन केव्हापासून साजरा केला जातो, मृदा दिन साजरा करण्यामागचा हेतू काय आहे याबद्दल माहिती दिली
प्राध्यापक केतकी धाडवे यांनी मृदेचे आरोग्य म्हणजे काय आरोग्य टिकून ठेवण्यासाठी कोणते प्रयत्न करणे गरजेचे आहे तसेच मृदा प्रदूषण मृदेची धूप होण्यासाठी करावयाचे उपाय योजना याबद्दल सखोल मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी मृदेचे आरोग्य हे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी आपण स्वतः पासून सुरुवात करणे, मातीचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे व जमिनीची सुपीकता व उत्पादकता टिकून राहण्यासाठी माती परीक्षण करून घेणे का गरजेचे आहे याबाबत विस्तृत माहिती दिली
अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. रणजीत पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना माती परीक्षण हे किती महत्त्वाचे आहे याबाबतचा अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला व माती परीक्षणामुळे होणारे फायदे देखील विद्यार्थ्यांना सांगितले त्याचबरोबरीने या दिनानिमित्त मातीचे संवर्धन मातीचे संवर्धन आपली जबाबदारी आहे व ती जबाबदारी पार पाडण्याची आवाहन विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रासेयो स्वयंसेविका सोनम घाटगे हिने केले. या कार्यक्रमाचे आयोजन गुगलमीट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS