लोकमंगल बँकेतर्फे सलून व्यावसायिकांना अर्थसहाय्य

लोकमंगल बँकेतर्फे सलून व्यावसायिकांना अर्थसहाय्य सोलापूर (प्रतिनिधी) लॉकडाऊन व कोरोनाच्या काळात संकटामध्ये अडचणीत सापडलेल्या सोलापूर शहर व परिसरातील

लोकमंगल बँकेतर्फे सलून व्यावसायिकांना अर्थसहाय्य
सोलापूर (प्रतिनिधी)
लॉकडाऊन व कोरोनाच्या काळात संकटामध्ये अडचणीत सापडलेल्या सोलापूर शहर व परिसरातील 100 सलून व्यावसायिकांना लोकमंगल बँकेतर्फे अर्थसहाय्य देण्यात आले. आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते त्यांना धनादेश वितरीत करण्यात आला.
लॉकडाऊनच्या काळात आ. देशमुख यांनी कॉल कॉन्ङ्गरन्सद्वारे सलून व्यावसायिकांशी संवाद साधला होता. त्यावेळी व्यावसायिकांनी बँकेतर्ङ्गे मदत करावी, अशी विनंती केली होती. आ. देशमुख यांनी त्यांची अडचण जाणत त्यांना बँकेतर्ङ्गे अर्थसहाय्य दिले. धनादेश देताना सिद्राम रुद्रार, अभयकुमार कांती, बँकेचे सरव्यवस्थापक दिनकर देशमुख, व्यवस्थापक नवनाथ बिराजदार, सुदन सुरवसे, मोहन जमदाडे, आनंद सिंगराल, संतोष राऊत, माधुरी पारपल्लीवार, शोभा राऊत यांच्यासह सलून व्यावसायिक उपस्थित होते.

COMMENTS