लोकमंगल फाऊंडेशनची लोटस योजना  26 विद्यार्थ्यांना 3 लाख 52 हजार रुपयांची मदत

लोकमंगल फाऊंडेशनची लोटस योजना 26 विद्यार्थ्यांना 3 लाख 52 हजार रुपयांची मदत

लोकमंगल फाऊंडेशनची लोटस योजना 26 विद्यार्थ्यांना 3 लाख 52 हजार रुपयांची मदत सोलापूर : लोकमंगल फाऊंडेशनच्या लोटस योजनेखाली काल सोलापुरातल्या 26 ग

लोकमंगल फाऊंडेशनची लोटस योजना

26 विद्यार्थ्यांना 3 लाख 52 हजार रुपयांची मदत

सोलापूर : लोकमंगल फाऊंडेशनच्या लोटस योजनेखाली काल सोलापुरातल्या 26 गरीब, गरजू आणि गुणवंंत विद्यार्थ्यांना 3 लाख 52 हजार रुपयांची मदत  माजी सहकार मंत्री, आमदार सुभाषबापू  देशमुख यांच्या हस्ते देण्यात आली. या 26 जणांत सहा विद्यार्थिनी समाविष्ट आहेत. या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी येत होत्या आणि त्यांचे शिक्षण अखंडित सुरू राहणे अशक्य झाले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना या मदतीतून मोठा दिलासा मिळाला आहे.

या मदत वाटपाच्या कार्यक्रमातच लोटस योजनेबाबत एक सुखद अनुभव आला. आकाश भीमराव आदाटे (रा. कारंबा, ता. उ. सोलापूर) याने लोटस योजनेला 10 हजार रुपयांची देणगी दिली. आपण याच योजनेतून मदत मिळाल्यामुळे आपले शिक्षण पूर्ण करू शकलो. आता आपल्याला त्या शिक्षणाचा फायदा मिळून नोकरी मिळाली आहे आणि आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. आता अजून कोणा विद्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी आपण 10 हजार रुपये देऊन एक प्रकारे परतफेड करीत आहोत असे आदाटे यांनी सांगितले.

आकाश आदाटे यांचे वडील शेतकरी आहेत. 2016 साली त्यांना एम. बी. ए. चे शिक्षण घेताना, ऐन वेळी पैशाची अडचण आली. लोटस योजनेतून  18 हजार रुपयांची मदत मिळाली म्हणून आपण शिक्षण पुरे करू शकलो. अशीच मदत शेवटच्या वर्षीही मिळाली व शिक्षण सुरळीत पार पडले. आता आदाटे हे ॲक्सिस बँकेत नोकरी करीत आहेत.

COMMENTS