लोकमंगल फाऊंडेशनचा सामुदायिक विवाह सोहळा 21 नोव्हेंबर रोजी होणार

लोकमंगल फाऊंडेशनचा सामुदायिक विवाह सोहळा 21 नोव्हेंबर रोजी होणार सोलापूर (प्रतिनिधी) लोकमंगल फाऊंडेशन आयोजित  सामुदायिक विवाह सोहळा कोरोना प्रति

लोकमंगल फाऊंडेशनचा सामुदायिक विवाह सोहळा 21 नोव्हेंबर रोजी होणार

सोलापूर (प्रतिनिधी)

लोकमंगल फाऊंडेशन आयोजित  सामुदायिक विवाह सोहळा कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करून 21 नोव्हेंबर रोजी गोरज मुहूर्तावर  विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालयात होणार असल्याची माहिती फौंडेशनचे संचालक अविनाश महागावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंदाचे विवाह सोहळ्याचे 16 वर्ष असून आजवर लोकमंगल फाऊंडेशनच्यावतीने 2981 जोडप्यांचे विवाह संपन्न झाले आहेत.   यंदाचा विवाह सोहळा 21 नोव्हेंबर रोजी होणार असून   विवाह सोहळ्यात सहभागी होणार्‍या वधू-वरास विवाहाचे कपडे, हळदीचे कपडे, भोजनाची सोय,  मानाचा आहेर, स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था, वधूस मणिमंगळसूत्र, जोडवे देण्यात येणार आहेत, त्याशिवाय संसारोपयोगी साहित्यही देण्यात येणार असल्याचे महागावकर यांनी सांगितले.   विवाहानंतर वधू-वरांनी आयुष्यात कसे वागावे, नवीन घरात प्रवेश केल्यानंतर वधूंनी सासरच्या मंडळींशी कसे समरस व्हावे, तसेच आरोग्य विषयक जागरूकता, स्त्रीभ्रूणहत्या विरोधी भावना अशा सामाजिक जाणिवांचे समुपदेशन केले जाणार आहे. या विवाह सोहळ्यास सहभागी होवू इच्छिणार्‍यांच्या नातेवाईकांनी लोकमंगल फाऊंडेशनच्या होटगी नाका येथील कार्यालयात नाव नोंदणी करण्यासाठी संपर्क साधावा, विवाह सोहळ्याच्या माहितीसाठी लोकमंगल पंतसंस्था, लोकमंगल हॉस्पिटल, लोकमंगल कारखान्यासह जवळपास 25 ठिकाणी माहिती केंद्र उभारण्यात आल्याचेही महागावकर यांनी सांगितले.  या पत्रकार परिषदेला शशी थोरात उपस्थित होते.

COMMENTS