लोकमंगल पतसंस्थेत नवलबाई बोंदार्डे यांच्याकडून अन्नधान्य कीट वाटप

लोकमंगल पतसंस्थेत नवलबाई बोंदार्डे यांच्याकडून अन्नधान्य कीट वाटप सोलापूर (प्रतिनिधी) अवंती नगर येथील लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत नवलब

लोकमंगल पतसंस्थेत नवलबाई बोंदार्डे यांच्याकडून अन्नधान्य कीट वाटप

सोलापूर (प्रतिनिधी)
अवंती नगर येथील लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत नवलबाई आदिनाथ बोंदार्डे यांच्या हस्ते 50 गरीब लोकांना अन्नधान्याची किट वाटप करण्यात आले. लोकमंगल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गोरगरीब, कष्टकरी आणि विडी कामगारांना अन्नधान्याचे कीट वाटप करण्यात येत आहे. लोकमंगलचा हा उपक्रम पाहून नवलबाई बोंदार्डे यांनीही यात सहभाग नोंदवला आहे. त्यांनी 350 धान्य किट गरिबांना वाटण्यासाठी लोकमंगलकडे सुपूर्द केले आहेत.सोमवारी त्यांच्याच हस्ते किट वाटप करण्यात आले. यावेळी शाखेचे सल्लागार उत्तमराव हुंडेकर, शाखाधिकारी महिबुबी शेख व कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS