लोकमंगल  पतसंस्थेच्या  मांजरी बु. शाखेचे उद्घाटन

लोकमंगल  पतसंस्थेच्या  मांजरी बु. शाखेचे उद्घाटन सोलापूर (प्रतिनिधी) लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर या पतसंस्थेच्या 45 व्या  मांजरी

लोकमंगल बँकेतर्फे पत्रकारांचा सत्कार
सोलापूर पर्यटन ऍपचे अनावरण
लोकमंगल मल्टीस्टेटची सर्वोत्तम शाखा इटकळ शाखेचा आज वर्धापन दिन

लोकमंगल  पतसंस्थेच्या  मांजरी बु. शाखेचे उद्घाटन

सोलापूर (प्रतिनिधी)
लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर या पतसंस्थेच्या 45 व्या  मांजरी शाखेचे उद्घाटन  आ. सुभाष  देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मांजरीचे सरपंच शिवराज घुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भूषण तुपे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शैलेंद्र वेल्हेकर, भाजपा पंचायतराज आघाडीचे महामंत्री बाबासाहेब शिगोटे,  माजी उपसरपंच समीर घुले, संजय धारवाडकर, सुनिता घुले, रवींद्र गोगावले, सागर प्रभूने, प्रदीप गोगावले, शिवाजी थोबे, सचिन शेवाळे, योगेश शिंदे आदी उपस्थित होत यावेळी आ. देशमुख म्हणाले, आम्ही संस्थेचे मालक नसून फक्त विश्वस्त म्हणून काम करत आहोत, तसे पाहता संस्थेचे खरे मालक हे  सभासदच आहेत.  सभासदांच्या विश्वासामुळेच आपली ही पतसंस्था महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे नावारूपाला येत  आहे.  मांजरी या गावी या शाखेच्या रूपाने आपण आज रोजी एक छोटेसे रोपटे  लावत आहोत, या रोपट्याचे वटवृक्षा मध्ये रूपांतर होण्यासाठी प्रत्यकाने हातभार लावावा.  प्रास्ताविक संस्थेचे संचालक  युवराज  गायकवाड यांनी केले.  यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात प्रथम सभासद, खातेदार व प्रथम कर्जदारांचा सन्मान करण्यात आला.  या कार्यक्रमास चेअरमन गुरण्णा  तेली, संचालक शहाजी   साठे, सरव्यवस्थापिका  अलका  देवडकर, प्रशासकीय अधिकारी दत्तात्रय माळी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सतीश लोंढे यांनी केले, तर आभार प्रदर्शन  चेअरमन गुरण्णा  तेली यांनी केले. 

COMMENTS