लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात कवी कालिदास दिन साजरा

लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात कवी कालिदास दिन साजरा आषाढ शुक्ल प्रतिपदा या दिवशी महाकवी कालिदास यांचा जन्मदिन असतो. हा दिवस महाकवी का

लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात कवी कालिदास दिन साजरा
आषाढ शुक्ल प्रतिपदा या दिवशी महाकवी कालिदास यांचा जन्मदिन असतो. हा दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो.
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात महाकवी कालिदास दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजीत पाटील हे अध्यक्षस्थानी होते .या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हेमकिरण दत्तात्रेय पत्की, पाटबंधारे विभागात शाखा अभियंता म्हणून सेवानिवृत्त , सोलापूर त्याच बरोबर डॉ. प्रिया निघोजकर हे लाभले. कार्यक्रमात प्रारंभी महाविद्यालयातील विद्यार्थी श्रीराम कुलकर्णी , अजय जाधव, अविष्कार जाधव, स्वप्निल मार्कड, वैभव गरड. शंकर गरड, अमन बिलकर, प्रथमेश चव्हाण, किसन घाडगे ,सुयोग थोरात, हर्षदा निगडे, वैष्णवी गरड या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर कविता व मनोगत सादर केले. त्याचबरोबर महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक गणेश जाधव यांनी आपल्या कविता सादर केल्या. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी कवी कालिदास यांच्या काव्याबद्दल व लिखाणाबद्दल माहिती सांगितली व स्वयं लिखित विविध कविता सर्वांसमोर सादर केल्या. त्यांच्या कवितांचा सर्व विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाने मनापासून आस्वाद घेतला. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जीवनात प्रत्येक पायरीवर व्यक्त होणे महत्त्वाचे आहे व त्यासाठी काव्य हा उत्तम पर्याय आहे. काव्याचे विविध प्रकार आहेत व काव्य करण्यासाठी आपल्यात कल्पकता, दृष्टीकोन, भावना, जाणीव तसेच सुसंस्कृतपणा असणे आवश्यक आहे असे मनोगत प्राचार्य डॉ. रणजीत पाटील यांनी व्यक्त केले. महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक प्रवीण शेळके यांनी आभारप्रदर्शन व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रा. गोसावी एन. के, , प्रा. वाघज राहुल., प्रा. शुभम कुलकर्णी, प्रा. सागर पाटील, प्रा. श्रीकांत देवकर प्रा. ज्योती गायकवाड प्रा. सुप्रिया डोके ,प्रा. तृप्ती राठोड, प्रा. महानंदा बनसोडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी मस्के व प्रियंका शिंदे यांनी केले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS