लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात  कृषीदिन  साजरा

लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात कृषीदिन साजरा

लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात कृषीदिन साजरा राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या

लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात कृषीदिन साजरा

राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या स्मरणार्थ १ जुलै रोजी कृषी दिन साजरा केला जातो.
श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात कृषीदिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून कृषी क्षेत्रातील निविष्ठांचे विपणन व व्यवस्थापन या विषयाचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजीत पाटील हे अध्यक्षस्थानी होते .या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व युवा उद्योजक शुभम नागनाथ शिंदे, येलमवाडी मोहोळ हे लाभले होते. कार्यक्रमात प्रारंभी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कृषी व शेतकरी या विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये,स्वप्निल मार्कड, वैभव गरड, अनिकेत मोकाशी, धीरज वाले यांचा समावेश होता. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक शुभम शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना त्यांचे अनुभव , उद्योजक होत असताना आलेले अनुभव, भांडवल व्यवस्था , व्यवसाय कसा स्थापन करावा ,व्यवसायातील भविष्यातील संधी, लिखित ज्ञानाचे प्रात्यक्षिक रूपांतर कसे करावे याबाबतचे मत,नवीन व्यावसायिकांना भविष्यातील संधी , व्यवसाय निवडी बाबतचे मत , याबाबतचे अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. यानंतर आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजीत पाटील यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कार्याला उजाळा दिला व त्यांचा शेती बद्दल असणारा दूरदृष्टीकोन व शेतीबद्दल असणारी आस्था व त्यांनी घेतलेले धोरणात्मक निर्णय याबाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी शेती क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी स्वतः शेती क्षेत्राचे ब्रँड अँबेसिडर होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी अमृता माळी हिने आभारप्रदर्शन व्यक्त केले व वृक्षारोपणाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रा.गोसावी एन. के, प्रा. वागज राहुल, प्रा. शुभम कुलकर्णी, प्रा. सागर पाटील, प्रा. गणेश जाधव, प्रा. ज्योती गायकवाड, प्रा. सुप्रिया डोके ,प्रा. तृप्ती राठोड, प्रा. महानंदा बनसोडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनम घाटगे यांनी केले .या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS