लोकमंगल एबीएमची शैक्षणिक सहल

लोकमंगल एबीएमची शैक्षणिक सहल श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषि व्यवसाय व्

लोकमंगल एबीएमची शैक्षणिक सहल

श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील चतुर्थ सत्रातील विद्यार्थ्यांची कृषि विपणन विभाग अंतर्गत लोकमंगल मसाले, बीबीदारफळ या औद्योगिक कंपनीला भेट दिली. यावेळी श्री. बिराजदार सर व श्री. थिटे सर यांनी विद्यार्थ्यांना लाल मिरची,हळद, जिरे, धने, काळी मिरी, तमालपत्र इत्यादी मसाल्याचे घटक पदार्थ कच्चामाल म्हणून वापरले जाते व या मसाल्यांचे ब्रँडिंग, पॅकेजिंग, लेबलिंग,प्रक्रिया व उत्पादन कसे केले जाते, याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांनी मसाल्यांचा दर्जा, त्यांची सतत उपलब्धता ठेवणे व आर्थिक बाबतीत हिशोब पारदर्शी ठेवणे गरजेचे आहे असेही सांगितले. कोणत्याही व्यवसायात टिकून राहण्यासाठी संयम, वेळेचे बंधन, नियोजन, तत्परतेने निर्णय घेणे हे महत्त्वाचे असते, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. शैक्षणिक सहलीसाठी कृषि विपणन विषय शिक्षिका डॉ. महानंदा बनसोडे,कृषि विस्तार विषय शिक्षिका डॉ. तृप्ती राठोड व कृषि अर्थशास्त्र विषय शिक्षक प्रा. प्रवीण शेळके उपस्थित होते. या सहलीसाठी लोकमंगल कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजीत पाटील व सर्व प्राध्यापक वर्ग यांचे सहकार्य लाभले.

COMMENTS