लोकमंगलने सिद्धरामेश्वरांच्या दासोहचे संवर्धन केले : घळसासी

लोकमंगलने सिद्धरामेश्वरांच्या दासोहचे संवर्धन केले : घळसासी

लोकमंगलने सिद्धरामेश्वरांच्या दासोहचे संवर्धन केले: घळसासी अन्नपूर्णा योजनेचे दशलक्षपूर्ती सोहळा उत्साहात सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्ध

लोकमंगलने सिद्धरामेश्वरांच्या दासोहचे संवर्धन केले: घळसासी
अन्नपूर्णा योजनेचे दशलक्षपूर्ती सोहळा उत्साहात

सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांनी समग्र मानवजातीसाठी दासोह उभारले. त्याच धर्तीवर आ.सुभाष देशमुख यांनी अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या विचारांचा वारसा जपला जपत सात्विक शक्तीचे संघटन करण्याचे महत्वकार्य लोकमंगलच्या वतीने केल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी काढले.

शुक्रवारी सायंकाळी शहरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या वा.का. किर्लोस्कर सभागृहात लोकमंगल फाउंडेशन संचलित अन्नपूर्णा योजनेचे १० लाख डबे वितरणाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल दशलक्षपूर्ती सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत याप्रसंगी व्यासपीठावर लोकमंगल समुहाचे संस्थापक आ.सुभाष देशमुख, आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले, लोकमंगल फाउंडेशन संचालक शहाजी पवार, अविनाश महागावकर, पतंजली योग समितीच्या सुधा अळळीमोरे, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री अन्नपूर्णा मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झाला.

यावेळी ज्येष्ठ निरूपणकार घळसासी म्हणाले, सामाजिक कार्यकर्त्यांनी शरजवंताप्रती पूज्यभावनेनेच राहावे, एखाद्याला सहाय्य करताना त्याच्या वैयक्तिक अभिमानाला धक्का लागू नये असे मी नेहमी सांगतो लोकमंगलने अन्नपूर्णा योजना राबविताना नेमका हाच कटाक्ष ठेवला असून दातृत्वाबरोबरच विवेकही जपला आहे. सध्या योजनेची व्याप्ती सोलापूर शहरात आहे. भविष्यात टप्पाटप्याने जिल्हा आणि त्यानंतर राज्यभरातही योजना पोहोचवून महाराष्ट्र भूकमुक्त करण्यास काम लोकमंगलने करावे. याप्रसंगी आचार्य भोसले म्हणाले पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या ‘अंत्योदय’ चा विचार लोकमंगलने मृर्तरुपात आणला असून लोकसहभागातून अन्नदानाची संस्कृती जोपासण्याच्या या कार्याला तोड नाही. सोलापूरकरांनाही या महान कार्यात सहभागी व्हावे.

प्रास्ताविकात आ.देशमुख यांनी, अन्नपूर्णा योजना सुरु करण्यामागचा इतिहास उपस्थितासमोर मांडला. दरम्यान कार्यक्रमात अन्नपूर्णा योजनेत सेवा कार्य करणाऱ्या स्वयंपाकी महिला, लाभार्थ्यांना डबा पुरविणारे रिक्षाचालक यांचा सन्मान करण्यात आला. तसेच लोकमंगलच्या अन्नपूर्णा योजनेसारखेच अन्नदानाचे कार्य करणाऱ्या विविध सेवाभावी संस्थाचा गौरव करण्यात आला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी आणि ऐश्वर्या हिबारे यांनी तर आभार प्रदर्शन भाजपाचे सरचिटनीस शशी थोरात यांनी केले. या सोहळ्यात शहरासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.

COMMENTS