लोकमंगलच्या माध्यातून 36 जोडप्यांच्या सोनेरी आयुष्याला सुरूवात सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात; विविध स्तरातील मान्यवरांची उपस्थिती

लोकमंगलच्या माध्यातून 36 जोडप्यांच्या सोनेरी आयुष्याला सुरूवात सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात; विविध स्तरातील मान्यवरांची उपस्थिती रविवारी  सायं

लोकमंगलच्या माध्यातून 36 जोडप्यांच्या सोनेरी आयुष्याला सुरूवात

सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात; विविध स्तरातील मान्यवरांची उपस्थिती

रविवारी  सायंकाळी सूर्य अस्ताला जात असताना……. लगीन घाई सुरू… 36 जोडपी कपाळाला बाशिंग  बांधून मंचावर आली… या जोडप्यांना कुठलाच धर्म नव्हता, आयुष्यभर साथ देण्यासाठी…  त्यांच्या रेशीमगाठी बांधल्या  लोकमंगल फौंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेला 32 वा सर्वजातीय सामुदायिक विवाह सोहळ्यात. याचे साक्षीदार होण्यासाठी विविध स्तरातील मान्यवरही आले होते.
माजी सहकार मंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 21 नोव्हेंबर रोजी  शासनाच्या सर्व अटी आणि नियम पाळत लोकमंगल फौंडेशन विवाह सोहळा   साखर कारखाना येथील काडादी मंगल कार्यालयात साध्या पद्धतीने आणि उत्साहात पार पडला.   हा सामूहिक विवाह सोहळा विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालय नेहरुनगर (डी. एड. कॉलेजच्या) मैदानावर होणार होता. पण सोलापुरात सध्या पावसाचे वातावरण असल्याने विवाहस्थळ बदलण्यात आले होते.
या विवाह सोहळ्याचे हे 16 वे वर्ष होते. या विवाह सोहळ्यात 36  वधू-वरांनी रेशीमगाठी बांधल्या. कोरोनाची सर्व नियम पाळून हा विवाह सोहळा पार पडला. आलेल्या वर्‍हाडी मंडळींना मास्कचे वाटप करण्यात आले. बैठक व्यवस्थाही सोशल डिस्टन्सच्या पद्धतीने करण्यात आली होती. यंदा मिरवणुकीला परवानगी नसल्याने दरवर्षीप्रमाणे यंदा वधू-वरांची वरात निघाली नाही. लग्नासाठी  वधू- आणि वरांकडील 50 मोजक्याच व्यक्तींना  आमंत्रण देण्यात आले. लग्न सोहळ्यात उपस्थित असलेल्या वधूवरांच्या पालक तसेच नातेवाईकांना स्वादिष्ट भोजन देण्यात आले. मसाले भात, पोळी भाजी, भजी आणि मोती चूर  लाडू असा मेनू होता. जेवणाची व्यवस्था शहाजी पवार आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केली होती.
चौकट
वधू-वरांना संसारोपयोगी साहित्य देऊन कन्यादान
यंदाच्याही या सोहळ्यात आ. सुभाष देशमुख आणि त्यांच्या पत्नी स्मिती देशमुख यांनी प्रथेप्रमाणे वधू-वरांना विवाहाचे कपडे, हळदीच्या कपड्यांसह ताट-वाटी, ग्लास प्रत्येकी 5 नग, बालकृष्णाची मूर्ती, स्टीलचा हंडा, स्टीलचा डबा, तांब्या असे संसारोपयोगी साहित्य देऊन कन्यादान केले. वधूंना मणी-मंगळसूत्र व जोडवे-बिचवे दिले. यंदा कोरोनामुळे वधू-वरांची मिरवणूक काढण्यात आली नाही.
चौकट
या मान्यवरांची होती उपस्थिती
याप्रसंगी  आ. सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी,   स्मिता देशमुख, श्री रेणुक शिवाचार्य महाराज (मंद्रुप), ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, लक्ष्मण महाराज, लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, युवा नेते मनीष देशमुख, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर, राजेंद्र मिरगणे,  उपमहापौर राजेश काळे, नगरसेवक सुभाष शेजवाल,  राजश्री चव्हाण, संगिता जाधव, संतोष भोसले, श्रीनिवास करली, नगरसेवक संगिता जाधव,  दक्षिणचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, दिलीप पतंगे, इंद्रजित पवार, बसवराज शास्त्री, अमर बिराजदार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

COMMENTS