लोकमंगलच्या अन्नपूर्णा योजनेचा 9 वा वर्धापन दिन साजरा सोलापूर (प्रतिनिधी) : लोकमंगल फाऊंडेशनतर्फे चालवल्या जाणाऱ्या अन्नपूर्णा योजनेचा 9 वा वर्धापन
लोकमंगलच्या अन्नपूर्णा योजनेचा 9 वा वर्धापन दिन साजरा
सोलापूर (प्रतिनिधी) : लोकमंगल फाऊंडेशनतर्फे चालवल्या जाणाऱ्या अन्नपूर्णा योजनेचा 9 वा वर्धापन दिन आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी योजनेच्या कार्यालयात महिलांचा सन्मान करण्यात आला. या समारंभात स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे पदाधिकारीही सहभागी झाले होते.
यावेळी अन्नपूर्णा योजनेत स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या महिलांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या महिलांनी कोरोनाची साथ असतानाही आपल्या जीवाची पर्वा न करता अन्नपूर्णा योजना चालू ठेवली होती, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी नगरसेवक श्रीनिवास करली यांच्या हस्ते अन्नपूर्णा योजनेत कार्यरत असलेल्या महिलांना भेट वस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमाला अपर्णा सहस्रबुद्धे, गांधी नाथा रंगजी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुनंदा बुधनेर, संघटनेच्या सचिव श्वेता व्हनमाने, समाज सेविका अर्चना वडनाल, कल्पना रेडेकर इत्यादींची उपस्थिती होती.
COMMENTS