लवंगी येथे आ. सुभाष देशमुख यांची भेट पिडीत कुटुंबाच्या नातेवाईकांचे केले सांत्वन

लवंगी येथे आ. सुभाष देशमुख यांची भेट पिडीत कुटुंबाच्या नातेवाईकांचे केले सांत्वन सोलापूर (प्रतिनिधी) दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील एकाच

लवंगी येथे आ. सुभाष देशमुख यांची भेट
पिडीत कुटुंबाच्या नातेवाईकांचे केले सांत्वन

सोलापूर (प्रतिनिधी)
दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील एकाच कुटुंबातील चार मुलांचा शनिवारी नदीत बुडून मृत्यू झाला. रविवारी आ. सुभाष देशमुख यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेत मुलांच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी आ. देशमुख यांनी तहसीलदार आणि संबंधित अधिकार्‍यांना सूचना देत पिडीत कुटुंबाला सवातोपरी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या.
शनिवारी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या समीक्षा शिवाजी तानवडे, अर्पिता शिवाजी तानवडे, आरती शिवानंद पारशेट्टी, विठ्ठल शिवानंद पारशेट्टी या मुलांचा बुडून मृत्यू झाला. रविवारी त्यांचा शोध घेण्याचे काम नदी परिसरात सुरू होते. आ. सुभाष देशमुख यांनी सकाळच्या सुमारास घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित मुलांच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचे सांत्वन करत धीर देण्याचा प्रयत्न केला. प्रशसानाकडून कुटुंबाला सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल याची गाव्ही नातलगांना दिली. यावेळी तहसीलदार उज्वला सोरटे, पो.नि. नितीन थेटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट
नदीकाठच्या भागात बोटी ठेवण्याचे आदेश
आ. देशमुख यांनी मदत व पुनवर्सन विभागाचे सचिव सचिन गुप्ता यांच्याशी ङ्गोनवरून चर्चा करत नदी काठाच्या भागात बोटी ठेवण्याचे आदेश दिले. पावसाळ्यात या नदीला भरपूण पाणी येते. त्यामुळे आणखी धोका वाढण्याची शक्यता आहे. सध्या तेथे असलेल्या बोटी नादुरूस्त आहेत, नवीन बोटी नदी काठी ठेवावेत असे आदेश आ. देशमुख यांनी केले.

COMMENTS