लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही, अर्थसंकल्पावर आमदार सुभाष देशमुख यांची प्रतिकिया

लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही अर्थसंकल्पावर आमदार सुभाष देशमुख यांची प्रतिकिया सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेला अर्थसंकल

लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही

अर्थसंकल्पावर आमदार सुभाष देशमुख यांची प्रतिकिया

सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प अतिशय निराशाजनक आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विशेष असे काहीही नाही. महात्मा फुले कर्ज माफी योजनेमधून  दर वर्षी शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे सांगितले जाते मात्र ते अद्याप पर्यंत मिळालेले नाहीत. म्हणजेच लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही असा हा प्रकार आहे. गरिबासाठी कोणत्याही योजना या अर्थसंकल्पात मांडण्यात आलेल्या नाहीत.  महाराष्ट्राला वैभवशाली बनवण्याच्या कोणत्याही गोष्टी या अर्थसंकल्पात नाही, अशी प्रतिक्रिया आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.

COMMENTS