राज्य सरकारशी  झगडून निधी आणत  विकासकामे  करू : आ.  सुभाष देशमुख

राज्य सरकारशी झगडून निधी आणत विकासकामे करू : आ. सुभाष देशमुख

राज्य सरकारशी झगडून निधी आणत विकासकामे करू : आ. सुभाष देशमुख देगाव येथील अंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सोलापूर. :   राज्यात महाविकास आघाडी

राज्य सरकारशी झगडून निधी आणत विकासकामे करू : आ. सुभाष देशमुख

देगाव येथील अंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

सोलापूर. :   राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे भाजपच्या आमदारांना निधी कमी मिळत आहे.दक्षिण आणि उत्तर तालुक्यातील सुमारे 750 कामांची यादी राज्य सरकारकडे दिली आहे मात्र ती मंजूर झालेली नाही. मात्र तरीही सरकारशी झगडून निधी आणत दक्षिण तालुक्यातील मतदारसंघाचा विकास करणारच अशी ग्वाही आ. सुभाष देशमुख यांनी दिली.
देगाव येथे आ. सुभाष देशमुख यांच्या फंडातून आठ कोटींच्या अंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी करण्यात आले त्या वेळी आ. देशमुख बोलत होते. यावेळी विजयकुमार आडके यांच्यासह सुमारे शंभर ते दिडशे कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार सुभाष देशमुख बोलताना पुढे म्हणाले की, गेल्या वेळी राज्यात भाजपचे सरकार होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दक्षिण आणि उत्तर तालुक्याला भरघोस निधी मिळाला. मात्र यंदा विरोधी पक्षाचे सरकार असल्यामुळे कामाला मर्यादा येत आहेत. तरीही आपण राज्य सरकारशी झगडून निधी आणत आहोत. जास्तीत जास्त निधी आणून तालुक्याचा विकास करण्यास आपण कटिबद्ध आहोत. भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा नेहमीच सन्मान केला जातो. पक्षामध्ये केवळ तीनच वर्ष कार्यकर्ता हा पदाधिकारी असतो. त्यानंतर तो पुन्हा कार्यकर्ता होतो. मात्र इतर पक्षात घराणेशाही सुरू आहे. त्यामुळे लोकांचा ओढा हा भारतीय जनता पक्षाकडे वाढला आहे. कार्यकर्त्यांनाही तळागाळापर्यंत जाऊन काम करावे आणि पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहनही आ. देशमुख यांनी यावेळी केले. यावेळी पक्षाचे सरचिटणीस शशी थोरात, आनंद बिराजदार, शिवराज सरतापे, प्रथमेश कोरे, सुरेश कराळे, विठ्ठल चोथवे, विजय फुटाणे, रफिक मुल्ला यांच्यासह देगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS