मोहोळ चौकातील भुयारी मार्गासाठी 20 कोटी 63 लाखांची मंजुरी, आमदार सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

मोहोळ चौकातील भुयारी मार्गासाठी 20 कोटी 63 लाखांची मंजुरी आमदार सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश सोलापूर (प्रतिनिधी) सोलापूर - पुणे राष्ट्

मोहोळ चौकातील भुयारी मार्गासाठी 20 कोटी 63 लाखांची मंजुरी

आमदार सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर (प्रतिनिधी)
सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ येथील कन्या प्रशाला जवळील राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक येथे भुयारी मार्गाची अत्यंत गरज होती. याबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी वेळोवेळी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून येथील भुयारी मार्गासाठी गडकरी यांनी 20 कोटी 63 लाख रुपये मंजूर केले आहेत. त्याबद्दल आ. सुभाष देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन करून आभार मानले आहेत.
मोहोळ येथील कन्या प्रशाला जवळील चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. त्यामुळे येथून येणाऱ्या जाणाऱ्यांना खासकरून शाळकरी मुलांना आणि वृद्ध माणसांना त्रास होत होता. अनेकवेळा येथे अपघात होऊन अनेकांचे प्राणही गेले आहेत. त्यामुळे या चौकातून भुयारी मार्ग करावा, अशी मागणी आमदार देशमुख यांनी 2015 पासून सातत्याने केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे केली होती. त्याचा पाठपुरावाही सुरू होता. अखेर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी भुयारी मार्गासाठी 20 कोटी 63 लाख रुपये निधी मंजूर केले. त्याबद्दल आ. सुभाष देशमुख यांनी गडकरी यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS