मिल कामगार ते संचालक, लोकमंगलचे नवे संचालक बालाजी शिंदे यांची यशस्वी वाटचाल

मिल कामगार ते संचालक लोकमंगलचे नवे संचालक बालाजी शिंदे यांची यशस्वी वाटचाल सोलापूर - लोकमंगल ही केवळ संस्था नाही तर माणसे घडवण्याचा कारखाना आहे. तिथ

मिल कामगार ते संचालक
लोकमंगलचे नवे संचालक बालाजी शिंदे यांची यशस्वी वाटचाल
सोलापूर – लोकमंगल ही केवळ संस्था नाही तर माणसे घडवण्याचा कारखाना आहे. तिथे सामान्यातल्या सामान्य कुटुंबातल्या माणसालाही संधी दिली जाते असा माझा अनुभव आहे असे मत लोकमंगल मल्टीस्टेटचे नवे संचालक बालाजी शिंदे यांनी मोठ्या कृतज्ञतेने व्यक्त केले. आपल्याला ही संधी मिळाली याविषयी त्यांनी चेेअरमन रोहन देशमुख आणि संस्थापक मा. आमदार सुभाषबापू देशमुख यांचे आभारही मानले.
बालाजी शिंदे हे तुळजापूर तालुक्यातल्या चव्हाणवाडीचे राहणारे आहेत. ते पत्र्याच्या घरात रहात होते आणि अजूनही म्हणजे संचालक झाल्यावरही तिथेच राहतात. २००८ साल पर्यंत त्यांचा सुभाषबापू, लोकमंगल किंवा भारतीय जनता पार्टी यांच्याशी काहीही संबंध नव्हता. ते सोलापूर जवळच्या धायफुले स्पिनिंग मिलमध्ये कामगार होते.
मा. सुभाष बापू यांची लोकमंगल ही संस्था असून तिच्या माध्यमातून ते गोरगरिबांना मदत करतात आणि शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यास मार्गदर्शन करतात एवढंीच त्यांना माहिती होती. आणि त्यातून त्यांना बापूंविषयी मोठा आदर वाटत असे. २००९ साली बापू त्यांच्या तुळजापूर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीला उभे राहिले आणि बालाजी शिंदे यांनी भाजपाशी कसलाही संबंध नसताना आणि बापूंना न कळता आपल्या मनानेच जमेल तसा प्रचार केला.
२०११ साली त्यांचा प्रत्यक्ष संपर्क मा. रोहन दादा यांच्याशी आला. कारण त्यांनी तुळजापूर तालुक्यात संपर्क साधायला सुरूवात केली होती. त्याच सुमारास बालाजी शिंदे यांच्या चव्हाणवाडी गावाच्या जवळच्या काटगावात लोकमंगल मल्टीस्टेटची शाखाही निघाली होती. तसेच लोकमंगलचे साखर कारखानेही सुरू झाले होते.
तेव्हाच या परिसरात हरणा नदीवर तलाव झाला आणि ऊस उत्पादन वाढले. त्याचवर्षी उसाचे अतिरेकी उत्पादन होऊन समस्या निर्माण झाल्या होत्या. या निमित्ताने शिंदे यांनी रोहन दादांशी संपर्क साधायला सुरूवात केली. एकदा दादांनी त्यांंना मल्टीस्टेटचे काही काम करता येईल का असे विचारले. काम म्हणजे ज्या गरीब लोकांना काही प्रगती करण्यासाठी आर्थिक मदत हवी असेल त्यांना मल्टीस्टेटपर्यंत आणणे.
शिंदे यांनी हकिकत सांगितली. ‘ हे काम मी करायला लागलो. पहिल्या प्रयत्नात १० शेतकरी आणि १० महिलांना एकूण २५ लाख रुपयांचे कर्ज मिळवून दिले. त्या कर्जाची १०० टक्के वसुलीही वेळेत झाली. मग पुढे परिसरातल्या काही गावांत माझ्या संपर्काचा वापर करून आणखी काही लोकांना सुमारे दीड कोटी रुपयांची कर्जे मिळवून दिली. त्यावर मला काटगाव शाखेच्या सल्लागार मंडळावर घेण्यात आले.’
पुढे बालाजी शिंदे हे लोकमंगलचाच एक भाग झाले. लोकमंगलचा जो काही उपक्रम होर्ई तिच्यात त्यांचा सहभाग असायला लागला. लोकमंगलचा सोलापुरात सामूहिक विवाहाचा कार्यक्रम असतो. तो त्यांनी पाहिला आणि असाच कार्यक्रम उस्मानाबाद जिल्ह्यातही सुरू करावा असा आग्रह रोहन दादांशी बोलताना धरला. त्यावर सोलापूर प्रमाणेच उस्मानाबादलाही सामूहिक विवाह सुरू झालेच पण त्यात शिंदे यांच्यावर भोजन व्यवस्थेत मोठी जबाबदारी टाकण्यात आली. ती पार पाडण्यासाठी त्यांनी आपल्या परिसरातली तरुण मुले नेली आणि जबाबदारी चांगल्या प्रकारे निभावली. यात ते काही गरीब मुला मुलींची लग्नेही जमवून देत असतात.
या नंतर लोकमंगल हा बालाजी यांच्या जीवनाचा भागच झाला. मा. सुभाष बापूंनी २०१५ साली सोलापुरात मोठे रोगनिदान शिबीर घेतले होते. त्यावर बालाजी यांनी असेच शिबीर उस्मानाबादेतही घ्यावे अशी मागणी केली. तसे शिबीर घेण्यात आले. त्यात तीन हजार लोकांची मोफत तपासणी होऊन त्यातल्या ७५० जणांवर मोफत शस्त्रक्रियाही करून घेतल्या.
सुभाष बापूंच्या संपर्कात आल्यामुळे आपल्याला समाजासाठी काही तरी करता येते याचे मोठे समाधान मिळत होते. पण जे करता येते ते किती मोठे आहे याचा आधी काही अंदाज नव्हता. तो बापू मंत्री झाल्यावर आला. तेव्हा बालाजी शिंदे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून या भागातल्या गरीब लोकांना २५ लाख रुपयांची मदत घेऊन दिली. या लोकांना ज्या दुर्धर रोगावरील शस्त्रक्रिया करणे अशक्य होते किंवा तिच्यासाठी घर किंवा शेत विकावे लागले असते त्या शस्त्रक्रिया या माध्यमातून अगदी कसलाही खर्च न करता झाल्या. अनेक लोकांचे आशीर्वाद लाभले. ही सारी किमया बापूंची तळमळ आणि शिंदे यांचा अफलातून जनसंपर्क यातूनच साधता आली.
शिंदे यांनी याच प्रकारे आपल्या परिसरातल्या २५० लोकांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया सोलापूरच्या अश्‍विनी रुग्णालयातून करून घेतल्या. गरीब मुलांना लोकमंगलच्या लोटस योजनेतून शिक्षणासाठी दीड लाख रुपये मिळवून दिलेे. एखादा माणूस हाडाचा कार्यकर्ता असतो म्हणजे काय हे सांगता येत नाही पण बालाजी शिंदे हाडाचा कार्यकर्ता असल्यामुळेच ही सारी अशक्य समजली जाणारी कामे करू शकले.
हा कार्यकर्ता बापूंच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. बापूंनी आणि दादांनी बालाजी शिंदे यांना लोकमंगल मल्टीस्टेटच्या संचालक मंडळावर घेण्याचा निर्णय घेतला. त्यांना तशी अपेक्षाही नव्हती आणि काही कल्पनाही नव्हती पण अचानकपणे एके दिवशी अविनाश महागावकर साहेबांचा फोन आला आणि त्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरण्यास सांगितले.
‘आता संंचालक झालो आहे पण मला ते सत्तेचे पद वाटत नाही. मी जी समाजाची सेवा करीत आलो तीच सेवा मला आता मोठ्या प्रमाणावर करण्याची संधी आहे. शिवाय मी एके काळी ज्या लोकांना पाहायला मिळणे हेच भाग्य समजत होतो. त्यांच्या सोबत संचालक मंडळात राहता येते आणि त्यांच्याकडून काही तरी शिकायला मिळते.’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

COMMENTS