माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यशस्वी करा आ. सुभाष देशमुख यांच्या अधिकार्‍यांना सूचना

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यशस्वी करा आ. सुभाष देशमुख यांच्या अधिकार्‍यांना सूचना सोलापूर (प्रतिनिधी) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यशस्वी करा
आ. सुभाष देशमुख यांच्या अधिकार्‍यांना सूचना
सोलापूर (प्रतिनिधी)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचेच्या दक्षिण तालुक्यातील नियोजनाचा आढावा आ. सुभाष देशमुख यांनी बुधवारी घेतला. ट्रेस, ट्रॅक, ट्रीट या त्रिसूत्राचा वापर करुन ही मोहीम यशस्वी करा, अशा सूचना आ. देशमुख यांनी अधिकार्‍यांना दिल्या.
शासकीय विश्रामगृहात दक्षिण तालुक्यातील नियोजन आढावा बैठक पार पडली.
यावेळी बैठकीस उपविभागीय अधिकारी शिंदे, तहसीलदार अमोल कुंभार, अप्पर तहसीलदार सोरटे, गटविकास अधिकारी देसाई तसेच शासकीय अधिकारी व आरोग्य अधिकारी उपस्थित होते. या योजनेचे नियोजन करण्यासंदर्भात तसेच येणार्‍या अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली.
बैठकीतकोरोना नियंत्रणासाठी मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रत्येक महापालिका, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक घराला भेट देऊन तपासणी व उपचार सुरू असून एका महिन्यात दोनदा घरापर्यंत जाऊन नागरिकांची तपासणी सुरू असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी आ. देशमुख यांनी या मोहिमेची संपूर्ण माहिती घेत योग्य त्या सूचना दिल्या.

COMMENTS