महाआघाडी सरकारने मराठा समाजाची माफी मागून आरक्षणाबाबत फेरविचार करावा  आ. सुभाष देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाआघाडी सरकारने मराठा समाजाची माफी मागून आरक्षणाबाबत फेरविचार करावा आ. सुभाष देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी सोलापूर :  1980 पासून मराठा आरक

महाआघाडी सरकारने मराठा समाजाची माफी मागून आरक्षणाबाबत फेरविचार करावा

आ. सुभाष देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सोलापूर :  1980 पासून मराठा आरक्षणाची चळवळ सुरु आहे, मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मराठा आरक्षण नको असल्याने त्यांच्या राजवटीत हा प्रश्‍न सुटला नाही, अशी टीका करतानाच भाजपचे आ.सुभाष देशमुख यांनी महाआघाडी सरकारने मराठा समाजाची माफी मागावी आणि आरक्षणाच्या फेरविचाराबाबत राज्य सरकारने समिती नेमावी, अशी मागणी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
प्रदेश भाजपच्या आदेशानुसार  मराठा आरक्षणाबाबत भाजपतर्फे पत्रकार परिषदेत आयोजन करण्यात आले होते, यावेळी आ. सुभाष देशमुख बोलत होते. याप्रसंगी खा. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी, आ. विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, पक्षनेते शिवानंद पाटील उपस्थित होते. याप्रसंगी आ.  देशमुख म्हणाले की, गत 40 वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्‍न आहे. आजवर 56 मोर्चे काढण्यात आले. फडणवीस सरकारच्या कालावधीत मराठा आरक्षण दिले गेले, पण न्यायालयाने ते रद्द केले. या प्रश्‍नी न्यायालयात महाविकास आघाडी सरकारला प्रभावीपणे बाजू मांडता आली नाही. अर्धवट माहिती न्यायालयाला देण्यात आली. परिणामी आरक्षण रद्द झाले. अजूनही वेळ गेलेली नाही. या प्रश्‍नी तज्ज्ञांची समिती नेमणे राज्य सरकारकडून अपेक्षित आहे. या समितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना घेतल्यास हा प्रश्‍न सुटण्यास मोठी मदत होईल.
चौकट
महाआघाडीतील सर्व घटक पक्ष फसवे
महाविकास आघाडीच्या सरकारने गत दोन वर्षांत मराठा समाजचे  नुकसान केले आहे. त्यामुळे या सरकारने मराठा समाजाची माफी मागावी आणि आरक्षण मिळवून देण्यासाठी ठोस काही तरी करण्याची गरज आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांची अंमलबजावणी बंद असल्याने मराठा बांधव त्याचा लाभ घेण्यापासून वंचित आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील तीनही घटक पक्ष हे फसवणूक करणारे आहेत, असा दावाही यावेळी आ. देशमुख यांनी केले.

COMMENTS