मल्टीस्टेट फेडरेशनच्या संचालकपदी रोहन देशमुख सोलापूर - राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायट्यांच्या फेडरेशन ऑफ मल्टीस्
मल्टीस्टेट फेडरेशनच्या संचालकपदी रोहन देशमुख
सोलापूर – राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायट्यांच्या फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पुण्यात पार पडली आणि तिच्यात सोलापूरच्या लोकमंगल मल्टीस्टेटचे चेअरमन रोहन देशमुख यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीसाठी झालेल्या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद साबळे यांनी काम पाहिले. संघटनेचे अध्यक्ष म्हणून सुरेश वाबळे तर उपाध्यक्ष म्हणून प्रा.व्ही. एस. अंकलकोटे यांची निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी साबळे यांनी केली.
फेडरेशन ही मल्टीस्टेट सोसायट्यांच्या धोरणावर विचार करणारी एकमेव राष्ट्रीय संघटना आहे. अशा संस्थांच्या वाटचालीत येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मार्ग काढण्याच्या दृष्टीने ही संघटना कार्यरत असते. या फेडरेशन मध्ये सध्या प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या संस्थांचा सहभाग आहे. लवकरच तिची व्याप्ती वाढवून तिच्यात सात राज्यातल्या मल्टीस्टेट संस्थांना समाविष्ट करण्यावर विचार केला जात आहे. अशा या वरिष्ठ स्तरावर कार्यरत असलेल्या संस्थेचे संचालक म्हणून काम पाहण्याची संधी लोकमंगल मल्टीस्टेटचे चेअरमन रोहन देशमुख यांना मिळाली आहे. त्यांनी लोकमंगल मल्टीस्टेटचे चेअरमन म्हणून मोठे काम केले असून अल्पावधीतच तिचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र आणि कर्नाटकात वाढवले आहे. या निवडीबद्दल रोहन देशमुख यांचे अभिनंदन होत आहे.
या निवडणुकीनंतर फेडरेशनचे कायदा सल्लागार प्रमोद गडगे, राज्य पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, शिवाजी अप्पा कप्पाळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी आणि संचालकांचा सत्कार करण्यात आला. या संचालक मंडळात धनलक्ष्मी हजारे, राहुल महाडिक, दिलीपसिंह भोसले, सुकुमार पाटील, अशोक ओव्हळ, रवीन्द्र कानडे, नारायण खांडेकर, जयसिंह पंडित, मारोतीराव कंठेवाड, कडूभाऊ काळे, मगराज राठी, जितेन्द्र जैन यांचीही निवड झाली आहे.
COMMENTS