मंद्रूप एम.आय.डी.सी. जागा भूसंपादनाबाबत बैठक लावण्याचे आदेश, आ. सुभाष देशमुख यांनी केली होती मागणी

मंद्रूप एम.आय.डी.सी. जागा भूसंपादनाबाबत बैठक लावण्याचे आदेश आ. सुभाष देशमुख यांनी केली होती मागणी सोलापूर मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथे एम.

विकासकामे करताना भेदभाव करणार नाही: आमदार सुभाष देशमुख डोणगाव- तेलगाव रस्त्याचे भूमिपूजन
सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी 827 कोटींचा निधी वितरित : आ.सुभाष देशमुख
पदवीधर, शिक्षक निवडणुकीत विजयाची पताका फडकवा : आ. सुभाष देशमुख यांचे आवाहन

मंद्रूप एम.आय.डी.सी. जागा भूसंपादनाबाबत बैठक लावण्याचे आदेश

आ. सुभाष देशमुख यांनी केली होती मागणी

सोलापूर
मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथे एम.आय.डी.सी. स्थापन करण्यासाठी आ. सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्यानंतर राज्यशासनाकडून 2019 साली मंजुरी दिली होती. याच्या भूसंपादनची कार्यवाही उपविभागीय अधिकारी क्र 2 यांच्या मार्फत सुरु आहे. जमिनीची मोजणी चालू असताना खातेदार शेतकर्‍यांनी मोजणीस विरोध केल्याने हे काम बंद करण्यात आले आहे. हे काम सुरू करण्यासाठी राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून प्रयत्न सुरु आहेत. मंडळाने प्रांताधिकार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांसोबत संबधित शेतकर्‍यांची बैठक लावण्याबाबत सूचना केल्या आहेत.
आ. सुभाष देशमुख यांनी शासनाकडे पाठपुरावा करत मंद्रुपसाठी एमआयडीसी मंजूर करून घेतली. याच्या जागेसाठी उच्च अधिकार समितीच्या बैठकीत जमिनीच्या मोबदल्यात प्रती एकरी 10 लाख प्रमाणे प्रती हेक्टरी 25 लाख रुपये दरास मंजुरी देण्यात आली आहे. काही शेतकर्‍यांना याला सन्मती दिली आहे तर काही शेतकर्‍यांनी याला विरोध केला आहे. त्यामुळे भूसंपादनाचे काम बंद आहे. दरम्यान, आ. देशमुख यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंंद्रुप एमआयडीसी जागा संपादन करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार राज्य औद्योगिक विकास महामंडळाने जिल्हाधिकार्‍यांसोबत शेतकर्‍यांची बैठक लावण्याबाबत प्रांताधिकार्‍यांना कळवले आहे.

COMMENTS