मंद्रुप ट्रामा केअर सेंटर इमारतीचा आरखडा सादर करण्याचे आदेश, आ. सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

मंद्रुप ट्रामा केअर सेंटर इमारतीचा आरखडा सादर करण्याचे आदेश आ. सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश सोलापूर (प्रतिनिधी) दक्षिण सोलापूर तालुक

गोरगरिबांची सेवा करण्यासाठीच देशमुख कुटुंबियांचा जन्म माजी खासदार किरीट सोमय्या यांचे प्रतिपादन
ग्रामीण भागात रक्तदान चळवळ वाढावी: सुभाष देशमुख
Why stock brokers should be 1 of the 7 deadly sins

मंद्रुप ट्रामा केअर सेंटर इमारतीचा आरखडा सादर करण्याचे आदेश

आ. सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश


सोलापूर (प्रतिनिधी)
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप ग्रामीण रूग्णालयात मंजूर ट्रामा केअर सेंटर इमारतीचे अंदाज पत्रक आणि आरखडा सादर करण्याचे आदेश  आरोग्य सेवा उपसंचालक मंडळाने बांधकाम विभागास दिले आहेत. याबाबत आ. सुभाष देशमुख यांनी  निधी मिळावी म्हणूपन मागणी केली होती. त्याला यश आले आहे.
जून महिन्यात आ. देशमुख यांनी पुणे आरोग्य सेवा उपसंचालक मंडळाला मंद्रुप रूग्णालयात ट्रामा केअर सेंटर मंजूर झाले असून या रूग्णालयाचा नकाशा, ब्लू प्रिंट बांधकाम विभाग करणार आहे, त्यासाठी 75 हजारांचा निधी आवश्यक आहे, तो त्वरित मिळावा, अशी मागणी केली होती. याबाबत त्यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर आरोग्य सेवा उपसंचालक मंडळाने सोलापूरच्या बांधकाम विभागाला इमारतीचे अंदाज पत्रक आणि आरखडा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

COMMENTS