भीमा सीना जोड कालव्यासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळावे आ.सुभाष देशमुख यांची मागणी सोलापूर

भीमा सीना जोड कालव्यासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळावे आ.सुभाष देशमुख यांची मागणी सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर बॅरेज येथून भीमा

पदवीधर, शिक्षक उमेदवारांच्या प्रचारार्थ आ. सुभाष देशमुख यांच्या बैठका
आ. सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश मोहोळ ते तांदुळवाडी महामार्गाला पहिल्या टप्प्यात 54 कोटींचा निधी मंजूर
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांना मताधिक्क्य देणार : आ.सुभाष देशमुख

भीमा सीना जोड कालव्यासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळावे

आ.सुभाष देशमुख यांची मागणी सोलापूर

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर बॅरेज येथून भीमा सीना जोड कालव्यासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी आ. सुभाष देशमुख यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
कृष्णा पाणी तंटा लवाद-1 नुसार उपलब्ध  असलेल्या पाणी वापराचे नियोजन झाले आहे. तसेच लवाद-2 चा निर्णय अद्याप अधिसूचित झाला नाही. प्रस्तावित योजनेंतर्गत भीमा नदीतील पुराचे पाणी सीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यात वळविण्याचे नियोजन आहे. हे पाणी वळण  लवादानुसार पाणी वापर म्हणून गणले जाणार आहे. त्यामुळे कृष्णा पाणी तंटा लवादातील सर्वंकष तरतूदींचा विचार करुन विषयांकित योजनेस पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त करणे गरजेचे आहे. तसेच कृष्णा खोर्‍यातील मंजूर पाण्याचे फेरनियोजनाच्या अनुषंगाने कृष्णा लवादाबाबत वरिष्ठांशी चर्चा करून लेखी अभिप्राय प्राप्त करण्याचे आदेश   जलसंपद विभागाच्या सचिवाने दिले आहेत. त्याची पूर्तता करण्याचे निर्देश कृष्णा खोरे विकास महामंडळाला दिले आहेत. ही कार्यवाही झाल्यानंतर या योजनेस पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देणे  शक्य होणार आहे, असे आ. देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे

COMMENTS