पक्ष बांधणी व संघटन करण्याच्या  फडणवीस आणि  चंद्रकांत पाटलांच्या सूचना

पक्ष बांधणी व संघटन करण्याच्या फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांच्या सूचना

भाजप प्रदेश कार्यसमितीची बैठक संपन्न पक्ष बांधणी व संघटन करण्याच्या फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांच्या सूचना सोलापूर (प्रतिनिधी ) : भारतीय जनता पार

भाजप प्रदेश कार्यसमितीची बैठक संपन्न

पक्ष बांधणी व संघटन करण्याच्या फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांच्या सूचना

सोलापूर (प्रतिनिधी ) : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश बैठक आभासी ( VC ) द्वारे बैठक सोलापूर येथे अलकनंदा जोशी कनिष्ठ महाविद्यालय जुळे सोलापूर येथे पार पडली. बैठकीमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना विविध बाबींवर मार्गदर्शन केले.

बुथ सशक्तीकरण अभियान, सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्व, आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या विविध स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार संस्था व नगरपरिषद आणि महानगरपालिका आदी संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मजबूत पक्षबांधणी व संघटन विस्तृतीकरण आदी मुद्द्यांवर या बैठकीमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीसाठी माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, आ. समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी ,माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे , प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजी पवार, के के पाटील, शंकर वाघमारे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, मंगळवेढा तालुकाध्यक्ष गौरीशंकर दादा बुरकूल, माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे, माळशिरस तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष काशिनाथ कदम, अक्कलकोट शहर अध्यक्ष शिवशरण जोजन,युवा मोर्चा अध्यक्ष प्रकाश घोडके, जिल्हा सरचिटणीस सुदर्शन यादव, विकास वाघमारे,भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष, बाळासाहेब सरगर विजय बुरकूल, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे महिला मोर्चा अध्यक्षा सौ धनश्री खटके पाटील, सविता कस्तुरे, माया माने, युवती प्रमुख संध्या कुंभेजकर,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के, रवि पाटील, बालाजी वाघमारे,गणेश भोसले, सोपान काका नारनवर,शशिकांत गावडे, संतोष मोगले, सुरेश पाटील, सिध्देश्वर गाडे, योगेश कबाडे,आदी मान्यवर, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS