उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी जोडव्यवसाय करावा, भाजपा किसान मोर्चा बैठकीत आ. सुभाष देशमुख यांचे आवाहन

उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी जोडव्यवसाय करावा, भाजपा किसान मोर्चा बैठकीत आ. सुभाष देशमुख यांचे आवाहन

उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी जोडव्यवसाय करावा भाजपा किसान मोर्चा बैठकीत आ. सुभाष देशमुख यांचे आवाहन सोलापूर  :  शेतकऱ्यांनी पिकनिहाय गावे करून अ

उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी जोडव्यवसाय करावा

भाजपा किसान मोर्चा बैठकीत आ. सुभाष देशमुख यांचे आवाहन

सोलापूर  :  शेतकऱ्यांनी पिकनिहाय गावे करून अंतरपीकाबरोबरच जोड व्यवसाय करावा जेणेकरून उत्पन्नवाढ होऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल, असे मत माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. विकासनगर सोलापूर येथे दक्षिण सोलापूर तालुका भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा बैठक व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आल, त्यावेळी आमदार देशमुख बोलत होते.यावेळी तालुकाध्यक्ष रामाप्पा चिवडाशेट्टी ,पक्षनेते अण्णाराव बाराचरे,किसान मोर्चा तालुकाध्यक्ष माणिकराव देशमुख,हणमंत कुलकर्णी,संदीप टेळे,अंबिका पाटील, अनु. जाती तालुकाध्यक्ष बलवान गोतसुर्वे,यतीन शहा, अप्पासाहेब मोटे,जगन्नाथ गायकवाड,सचिन पाटील, मधुकर चिवरे, अतुल गायकवाड, गौरीशंकर मेंडगुडले,बालाजी चंद्रपाटले,सोमनिंग कमळे,ईराप्पा बिराजदार,शकील मकानदार,सुनिल नांगरे आदी उपस्थित होते.प्रास्ताविक जेष्ठ नेते हणमंत कुलकर्णी यांनी केले.

पुढे बोलताना आ. देशमुख म्हणाले की, हरितक्रांतीच्या नावाखाली रासायनिक खताचा वापर वाढल्याने शेतीचा ऱ्हास झाला असून शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे. त्याच बरोबर मालतरण योजनेचा लाभ घेऊन आपल्या पिकाच्या किमतीच्या 75% रकमेवर 6%व्याजदराने कर्ज घेऊन योग्य किंमत आल्यावर आपला माल विकून  योग्य नियोजन करून उत्पनात वाढ कसे होईल हे बघायला हवे.

यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आ. सुभाष देशमुख, तालुकाध्यक्ष रामाप्पा चिवडाशेट्टी, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष माणिकराव देशमुख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी कार्यकर्ते व शेतकरी  उपस्थित होते. स्वागत आणि सूत्रसंचालन अप्पासाहेब मोटे यांनी केले तर आभार यतीन शहा यांनी मानले.

COMMENTS