पूरग्रस्तांना दक्षिण भाजपची मदत; हजारो चादरी केल्या रवाना सोलापूर (प्रतिनिधी) आ. सुभाष देशमुख यांच्या आदेशाने व युवा नेते मनिष देशमुख यांच्या मार्
पूरग्रस्तांना दक्षिण भाजपची मदत; हजारो चादरी केल्या रवाना
सोलापूर (प्रतिनिधी)
आ. सुभाष देशमुख यांच्या आदेशाने व युवा नेते मनिष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी दक्षिण सोलापूरच्यावतीने महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरग्रस्ताना मदतीचा हात म्हणून सोलापूरहून मदत पाठवण्यात आली. पूरग्रस्तांसाठी हजारो चादरी नुकत्याच पाठवण्यात आल्या.
कोल्हापूर येथे पंचगंगा आणि कृष्णाचा मोठा महापूर आला आहे. कोकणात देखील पावसाने थैमान घातले. अशातच लोकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. नागरिकांचे संसार उघड्यावर आले. अशा संवेदनशील परिस्थितीत दक्षिण भाजपकडून पूरग्रस्तांना हजारो चादरी बुधवारी सोलापूरातून कोल्हापूरकडे वाहनाद्वारे रवाना करण्यात आल्या. यावेळी बोलताना आ. देशमुख म्हणाले की, आलेले संकट फार मोठे आहे. महापुरामुळे नागरिकांचे संसार उघड्यावर आले. त्यामुळे एक माणुसकीचा हात म्हणून आपण मदत पाठवत आहोत. सर्व पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. येत्या काळात पूरग्रस्तांना अधिकची मदत करण्याच्या दृष्टीने देखील वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
COMMENTS