पावसाळ्यापूर्वी  स्वच्छतेची  सर्व कामे करा  आ.  सुभाष देशमुख यांच्या झोन अधिकाऱ्यांना सूचना

पावसाळ्यापूर्वी स्वच्छतेची सर्व कामे करा आ. सुभाष देशमुख यांच्या झोन अधिकाऱ्यांना सूचना

पावसाळ्यापूर्वी स्वच्छतेची सर्व कामे करा आ. सुभाष देशमुख यांच्या झोन अधिकाऱ्यांना सूचना सोलापूर  :  पावसाळ्यापूर्वी स्वच्छतेची कामे जलदगतीने करा

पावसाळ्यापूर्वी स्वच्छतेची सर्व कामे करा

आ. सुभाष देशमुख यांच्या झोन अधिकाऱ्यांना सूचना

सोलापूर  :  पावसाळ्यापूर्वी स्वच्छतेची कामे जलदगतीने करावीत , गटारी, नालेसफाई, रस्त्यावरील सफाई, खड्यात मुरुम टाकणे आदी कामे तातडीने करण्याबरोबरच आरक्षित जागेवर पाणी टाकी बसवण्याचा प्रस्ताव सादर करा अशा सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिकेच्या झोन अधिकाऱ्यांना केल्या.
पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी झोन अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीला झोन क्र 4, 5, 6 अधिकारी लामखाने , बिराजदार, लोखंडे, इंगळे, प्रचंडे, शेख, मोरे, आदी उपस्थित होते.
यावेळी आ. देशमुख यांनी प्रामुख्याने ड्रेनेजच्या पाण्याची व्यवस्था करणे, स्ट्रीट लाईट बसवणे , आवश्यक त्या ठिकाणी मुरमाची व्यवस्था करणे तसेच पडलेले खड्डे बुजवणे, तुंबलेल्या गटारी व नाले सर्व साफ करून घेणे, ज्या भागामध्ये ड्रेनेज पाणी जाण्यासाठी स्लोप नाही व ड्रेनेजचे पाणी रिव्हर्स येते अशा समस्यासाठी उपाय योजना सादर करणे यासह उद्यानांचा विकास करण्यासाठी महानगरपालिकेच्या उद्यानची माहिती सादर करावी त्याचबरोबर जुळे सोलापूर परिसरात महापालिकेची खेळाची मैदाने कुठे आहेत व त्याच्या विकासासाठी प्रस्ताव करावा, पिण्याच्या पाण्याची क्षमता वाढवण्यासाठी आणखी कुठे जागा आरक्षित आहेत त्यांची माहिती सादर करावी, त्या ठिकाणी पिण्याच्या टाक्या बनवता येतील यासाठीचा प्रस्ताव सादर करावा आदी महत्वाच्या सूचना केल्य. लवकरात लवकर ही कामे करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

COMMENTS