पदवीधर, शिक्षक निवडणुकीत विजयाची पताका फडकवा : आ. सुभाष देशमुख यांचे आवाहन

पदवीधर, शिक्षक निवडणुकीत विजयाची पताका फडकवा: आ. सुभाष देशमुख यांचे आवाहन सोलापूर (प्रतिनिधी) पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ यांची निवडणूक १

 गावपातळीवरील सर्व समस्यांवर लवकरच तोडगा काढू  आ. सुभाष देशमुख यांचे सरपंचांना आश्‍वासन
लसीकरणाच्या बाबतीत दुजाभाव केल्यास तीव्र आंदोलन, आ.सुभाष देशमुख यांचा इशारा
सलगरवस्ती येथील गणेश मंदिराच्या व्यासपीठाचे उद्घाटन

पदवीधर, शिक्षक निवडणुकीत विजयाची पताका फडकवा: आ. सुभाष देशमुख यांचे आवाहन

सोलापूर (प्रतिनिधी)


पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ यांची निवडणूक १ डिसेंबर या दिवशी होत असून पदवीधरचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख आणि शिक्षकचे उमेदवार जितेंद्र पवार यांना विक्रमी मताधिक्य देऊन विजयाची पताका फडकवा, असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
पदवीधर व शिक्षक उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी आमदार देशमुख यांनी विविध प्रभागात बैठका घेतल्या आणि रॅली काढल्या. जुळे सोलापूर भागातील सिंधु विहार येथे रोहित माने यांच्या निवासस्थानी भाजपा ओबीसी मोर्चा चे संघटन सरचिटणीस विशाल गायकवाड यांनी बैठकीचे आयोजन केले होते. दक्षिण विधानसभा क्षेत्रात अनेक ठिकाणी काॅर्नर बैठका घेऊन मतदारांशी संवाद साधला.
संग्राम देशमुख हे हाङाचे कार्यकर्ते आहेत तर जितेंद्र पवार यांच्याकडे उत्तम कौशल्य आहे.ही निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या अस्मितेची आहे.यामुळे प्रत्येकाने मतदान करून घेवून हा विजय सुकर करावा. ही जबाबदारी पदाधिकारी, कार्यकर्त्यानी पार पाङवी असे आवाहन आ. देशमुख यांनी केले.
यावेळी उपमहापौर राजेश काळे , मंडल अध्यक्ष महेश देवकर, मंडल सचिव आनंद बिराजदार , बाबुराव घुगे, निवृत्त कृषी अधिकरी राजन माने , शिवानंद पाटील , सूरज पवार , उपासेव सिंधु विहार मधील अनेक पदवीधर उपस्थित होते .

COMMENTS