पदवीधर निवडणुकीत भाजपचा गड राखा : मनीष देशमुख

पदवीधर निवडणुकीत भाजपचा गड राखा: मनीष देशमुख सोलापूर (प्रतिनिधी l पुणे पदवीधर मतदारसंघात नेहमी भाजपचे वर्चस्व राहिले आहे. भाजपने या मतदारसंघाच्या मा

पदवीधर निवडणुकीत भाजपचा गड राखा: मनीष देशमुख
सोलापूर (प्रतिनिधी l
पुणे पदवीधर मतदारसंघात नेहमी भाजपचे वर्चस्व राहिले आहे. भाजपने या मतदारसंघाच्या माध्यमातून पदवीधरांचे अनेक प्रश्न सोडविले आहेत. यंदाच्या निवडणुकीतही भाजपचा गड राखा, असे आवाहन भाजपाचे युवा नेते मनीष देशमुख यांनी केले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील देगाव येथे गुरुवारी राजू सुपाते यांच्या निवासस्थानी भाजपचे पुणे पदवीधर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशमुख यांनी उपस्थित पदवीधर युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवाजी कदम यांनीही यावेळी आपले विचार मांडले. यावेळी पृथ्वीराज सुर्वे, बंडू सुपाते, जयवंत सुपाते, धनाजी जगताप, अमर कस्तुरे, श्याम भुईटे, प्रदीप नामदे, आनंद भूईटे आदी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक विनायक कोरे यांनी केले.

COMMENTS