नातेपुते येथे लोकमंगल पतसंस्थेच्या 44 व्या शाखेचे उद्घाटन पहिल्याच दिवशी 33 लाखांच्या ठेवी सोलापूर (प्रतिनिधी) नातेपुते येथे लोकमंगल नागरी स
नातेपुते येथे लोकमंगल पतसंस्थेच्या 44 व्या शाखेचे उद्घाटन
पहिल्याच दिवशी 33 लाखांच्या ठेवी
सोलापूर (प्रतिनिधी)
नातेपुते येथे लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या 44 व्या शाखेचे उद्घाटन आ. सुभाष देशमुख, जि.प.चे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, व्यापारी अतुल दोशी, ह.भ.प. सागर महाराज बोराटे , संस्थेचे चेअरमन गुरण्णा अप्पाराव तेली, व्हा. चेअरमन निर्मला कुंभार आदींच्या उपस्थितीत झाले. पहिल्याच दिवशी 33 लाखांच्या ठेवी गोळा झाल्या.
यावेळी माळशिरस पंचायत समितीचे सदस्य माऊली पाटील, नातेपुते व्यापारी अशोसिएशनचे अध्यक्ष बाहुबली चंकेश्वरा, उद्योजक सुधीर काळे, गणेश पागे साहेब, पांडुरंग वाघमोडे, डॉ.एम.पी. मोरे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मिसाळ, राऊत उपस्थित होते.
यावेळी आ.सुभाष देशमुख म्हणाले की, नातेपुते गावामध्ये समाजकारण करताना राजकारण कदापि होत नाही. त्यामुळे पुढील काळात लोक हितासाठी कार्य करताना हातात हात घालून कार्य करतील. बाबाराजे देशमुख यांंनी लोकमंगल नामवंत पतसंस्था असून नातेपुते गावात चांगला प्रतिसाद मिळेल असे आश्वासन दिले. याप्रसंगी नातेपुते शाखेचे प्रथम कर्जदार राजकुमार लोखंडे यांना व्यावसायिक कर्ज वाटप करून सन्मान करण्यात आला. त्याबरोबरच प्रथम खातेदार म्हणून महादेव गमे, वसंतराव विभूते, शिवाजी चौगुले, जयंत चिंचकर, शिवाजी पवार यांचा सत्कार करण्यात आला. पहिल्याच दिवशी 33 लाखांच्या ठेवी गोळा झाल्या. यावेळी संस्थेचे सर्व संचालक मंडळ, संस्थेच्या सरव्यवस्थापिका अलका नितीन देवडकर, शाखाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक युवराज गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन सतीश लोंढे यांनी केले तर आभार प्रदर्शन चेअरमन गुरण्णा अप्पाराव तेली यांनी केले.
COMMENTS