दक्षिण मतदारसंघातून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणवेत

दक्षिण मतदारसंघातून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणवेत

दक्षिण मतदारसंघातून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणवेत भाजप दक्षिण पश्चिम- पूर्व मंडल पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आ. सुभाष देशमुख यांचे आवाहन सोलापूर

दक्षिण मतदारसंघातून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणवेत
भाजप दक्षिण पश्चिम- पूर्व मंडल पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आ. सुभाष देशमुख यांचे आवाहन

सोलापूर : मेरा बूथ संपर्क से मजबूतचा नारा देत भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या कार्यक्षेत्रात घरोघरी जाऊन नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती द्यावी. याशिवाय नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, आगामी महापालिका निवडणुकीत दक्षिण मतदारसंघातून भाजपचे सर्व उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
रविवारी होटगी रस्त्यावरील विकास नगर येथील आमदार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात भाजपा सोलापूर शहर दक्षिण आणि पूर्व मंडल पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी आ. सुभाष देशमुख, भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महापालिकेचे माजी सभागृह नेता श्रीनिवास करली, भाजपा दक्षिण – पश्चिम मंडलचे अध्यक्ष महेश देवकर, दक्षिण – पूर्व मंडल सरचिटणीस आनंद गदगे, भाजपा शहर चिटणीस डॉ. सरतापे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. देशमुख म्हणाले, आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाचे सोलापूर शहर दक्षिण मतदार संघातील 22 पैकी 22 नगरसेवक निवडून आणण्यासाठी शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि पन्ना प्रमुख आदींनी समन्वय आणि संघटित होऊन कामगिरी करायची आहे.

दरम्यान यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंजाबमध्ये ताफा अडविल्याच्या निंदनीय प्रकाराबाबत भाजपच्या वतीने शहरात विविध ठिकाणी निषेध करणे आणि पंतप्रधान मोदी यांच्या दीर्घायुष्य आणि निरोगी जीवनासाठी शहरातील विविध मंदिरात येत्या काळात महाआरती आणि पूजा विधी करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनीही उपस्थित भाजपाचे शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख आणि पन्ना प्रमुख आदींना मार्गदर्शन केले. या बैठकीत शहर दक्षिण आणि पूर्व मंडल पदाधिकाऱ्यांची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. निवडीबद्दल नूतन पदाधिकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीस नगरसेविका संगीता जाधव, वरलक्ष्मी पुरुड, अश्विनी चव्हाण, मनीषा म्हैसकर हुच्चे, मेनका राठोड, भाजप नेते व्यंकटेश कोंडी यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS