अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी भाजप  वचनबध्द : आ. सुभाष देशमुख

अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी भाजप वचनबध्द : आ. सुभाष देशमुख

अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी भाजप वचनबध्द : आ. सुभाष देशमुख दक्षिण तालुका भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची नेमणूक सोलापूर (प्र

अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी भाजप वचनबध्द : आ. सुभाष देशमुख

दक्षिण तालुका भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची नेमणूक

सोलापूर (प्रतिनिधी ) : देशातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी, उन्नतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार कटीबध्द आहे. राजकीय विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरीही भाजपाच खऱ्या अर्थाने अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी वचनबध्द असल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्ष तालुका दक्षिण सोलापूर अल्पसंख्याक आघाडीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची नेमणूक व नियुक्ती पत्र देताना आ. देशमुख बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती सोनाली कडते, शशिकांत दुपारगुडे, हणमंत कुलकर्णी, मळसिद्ध मुगळे, यतीन शहा, गौरीशंकर मेंडगुदले, साहेबलाल हवालदार आदी उपस्थित होते.
भाजपाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणावर येण्यासाठी अभियान सुरू करण्याची आवश्यकता आहे. या समाजाच्या प्रलंबित समस्या, त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन आमदार देशमुख यांनी केले. यावेळी भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS