दक्षिणमधे जातीय राजकारणापेक्षा विकासाचे  समीकरण जुळवाःआ. देशमुख दक्षिण तालुक्यात विविध विकासकामांचे उद्घाटन

दक्षिणमधे जातीय राजकारणापेक्षा विकासाचे  समीकरण जुळवाःआ. देशमुख दक्षिण तालुक्यात विविध विकासकामांचे उद्घाटन सोलापूर (प्रतिनिधी) दक्षिण सोलापूर

सोलापूरातून रेल्वे सेवा पूर्ववत करा: आ. सुभाष देशमुख यांची मागणी डिव्हिजनल मॅनेजर शैलेश गुप्ता यांची घेतली भेट
सीतामाई तलावाचा पर्यटनस्थळ म्हणून करावाः आ. सुभाष देशमुख
मराठा आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्याचाच, आ. सुभाष बापू देशमुख यांचे प्रतिपादन

दक्षिणमधे जातीय राजकारणापेक्षा विकासाचे  समीकरण जुळवाःआ. देशमुख

दक्षिण तालुक्यात विविध विकासकामांचे उद्घाटन

सोलापूर (प्रतिनिधी)
दक्षिण सोलापूर तालुक्यात गेली अनेक वर्ष जातीय समीकरण जुळवत दक्षिणच्या जनतेला निरक्षर ठेवण्याचे काम अनेकांने केले सोलापूर जिल्ह्यात 11 तालुक्यांपैकी दक्षिणमधे सर्वाधिक निरक्षर आहेत. तेव्हा  दक्षिणच्या जनतेने निरक्षर न राहता सुशिक्षित व्हावे आणि विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे, दक्षिणमधे जातीय राजकारणा पेक्षा विकासाचे  समीकरण जुळवावे असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले.
दक्षिण तालुक्यातील  नांदणी ते मंद्रुप रस्त्याचे भूमिपूजन तथा भंडारकवठे येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध योजनेतून विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळ्याच्या समारंभप्रसंगी ते बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जि.प.कृषी व पशुसंवर्धन सभापती अनिल गोटे, उपसभापती रामप्पा चिवडशेट्टी, पक्षनेते आण्णाराव बाराचारी, जि. प. सदस्या  प्रभावती पाटील, सरपंच चिदानंद कोटगोंडे, उपसरपंच सरिता तुरबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वसंत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होते. आ. देशमुख म्हणाले,  दक्षिण सोलापूर तालुक्यात बाराशे हेक्टर क्षेत्र पाण्याखाली असून  हा  तालुका जर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी शेती केल्यास  बारा हजार हेक्टर शेती ही पाण्याखाली येईल आणि संपुर्ण तालुक्याचे नाव हे देशात होईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे.  भंडारकवठे गावात एकूण 11 देवदेवतांची मंदिरे असून या मंदिराच्या माध्यमातून गावाचा विकास आणि पर्यटनस्थळ म्हणून गावचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात ओळख व्हावी.  दरम्यान, यावेळी या वेळी भंडारकवठे गावात कोरोना काळात उत्तम काम करणार्‍या  सर्व आशा वर्कर तसेच आरोग्य सेविका जयश्री काळे यांचा सत्कार  आ. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पंचायत समितीचे सदस्य एम.डी. कमळे, माजी उपसभापती संदीप टेळे,  हणमंत कुलकर्णी, तालुका सरचिटणीस यतीन शहा भिमाशंकर बबलेश्वर, महादेव पाटील, बापुराव पाटील प्रा.व्ही.के.पाटील, भारत बिराजदार, हणमंत पुजारी, सोमशंकर पाटील,भिमाशंकर विजापुरे,महासिध्द कुंभार,रविंद्र कदम, नबिसाहेब बारुदवाले,भालचंद्र नवले,सोमण्णा बिराजदार,विठ्ठल पाटील, निंबण्णा जंगलगी,  पंचायत समिती सदस्य शशीकांत दुपारगुडे, सचिन पाटील, गुरूबसय्या स्वामी, सोमनिंग कमळे, रवि कदम, ईरप्पा बिराजदार, बसवराज मुक्काणे, बु-हाण मुजावर, संदीप कमळे आदी उपस्थित होते.

COMMENTS