तेरामैल येथे आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते कोविड सेंटरचे उद्घाटन

तेरामैल येथे आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते कोविड सेंटरचे उद्घाटन सोलापूर (प्रतिनिधी) कोरोना रूग्णाचा वाढता प्रभाव पाहता दक्षिण सोलापूर तालुक्यातील

तेरामैल येथे आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते कोविड सेंटरचे उद्घाटन

सोलापूर (प्रतिनिधी)
कोरोना रूग्णाचा वाढता प्रभाव पाहता दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेरामैल येथे चौधरी हॉस्पिटलमध्ये कोवीड सेंटरचे उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. चिंतामणी चौधरी, पोलीस उपनिरीक्षक नितीन थेटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आ. देशमुख म्हणाले की, सोलापूरच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ग्रामीण भागात अत्यावश्यक सुविधा जास्त नसल्याने सर्व रुग्ण शहरात येत आहेत. त्यामुळे शहरातील हॉस्पिटलवरचा ताण वाढत आहे. या कोवीड सेंटरमुळे तालुक्यातील रुग्णांची वणवण कमी होऊन शहरातील हॉस्पिटल वरचा ताणही कमी होईल. रुग्णसंख्या वाढीनुसार या सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड आणि आयसोलेशन बेड वाढवण्यात येतील. या सेंटरसाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या पुरवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे देशमुख म्हणाले. यावेळी आमदार देशमुख यांनी कोवीड सेंटरमधील सर्व डॉक्टर, स्टाफ आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. सध्यस्थितीला या कोविड सेंटरमध्ये २५ बेड असून त्यामध्ये १० ऑक्सिजन बेड व १५ आयसोलेशन बेडसह सुरू करण्यात आले आहेत. या सेंटरमध्ये रुग्ण संख्येत होणाऱ्या वाढीनुसार बेड वाढविण्यात येतील असे डॉक्टरांनी सांगितले.

COMMENTS