जिल्ह्याला लसीचा साठा त्वरित न केल्यास रस्त्यावर उतरणार, आ. सुभाष देशमुख आक्रमक

जिल्ह्याला लसीचा साठा त्वरित न केल्यास रस्त्यावर उतरणार आ. सुभाष देशमुख आक्रमक सोलापूर (प्रतिनिधी) महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून सोला

आ. सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश मोहोळ ते तांदुळवाडी महामार्गाला पहिल्या टप्प्यात 54 कोटींचा निधी मंजूर
शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास मोदी सरकार वचनबद्ध , सहा वर्षातील सर्वंकष उपायांचा आढावा आ. देशमुखांकडून सादर
भंडारकवठे- माळकवठे- औज मं. रस्त्याचे आज आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन

जिल्ह्याला लसीचा साठा त्वरित न केल्यास रस्त्यावर उतरणार

. सुभाष देशमुख आक्रमक

सोलापूर (प्रतिनिधी)
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यावर कायम अन्याय होत आला आहे. उजनीचे पाणी पळवणे, रेमडिसीवरचा साठा पळवणे असे प्रकार घडले. आता  लसीचे डोसही पुण्याला पळवण्याचे प्रकार होत आहेत.  आता हा अन्याय आणखी सहन केला जाणार नाही. सोलापूरसाठी त्वरित लस उपलब्ध न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आ. सुभाष देशमुख यांनी दिला आहे.
लसीचा पुरवठा शासनाकडून होत नसल्याने शहरात सात  दिवसांपासून लसीकरण ठप्प आहे. दुसरीकडे पुण्यात रोज  लाख लोकांचे लसीकरण झाले. एकूण व दैनंदिन लसीकरणात सोलापूर पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात शेवटच्यास्थानी आहे.  याबाबत बोलताना आ. देशमुख म्हणाले की, केंद्राकडून लसीचा पुरवठा होत आहे. मात्र राज्य सरकारकडून जाणीव पूर्वक तुटवडा भासवला जात आहे. खासकरून सोलापूरवर ङ्गार मोठा अन्याय होत आहे. सोलापूरच्या वाट्याची प्रत्येक गोष्ट पुणे, बारमतीला पळवण्याचे प्रकार सुरू आहेत. उजनीचे पाणी, रेमडसिवर इंजेक्शन पळवण्याचा प्रकार झाला. आता सोलापूरच्या लसही पुण्याला पळवले जात आहे.  लसीकरण नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अनेकजणांचा पहिला डोस घेऊन 84 दिवस झाले आहेत तरी त्यांना दुसरा डोस मिळत नाही.  ही बाब अंत्यत्य गंभिर आहे. याबाबत पालकमंत्री काहीही बोलत नाहीत हे दुर्दैव आहे.    मात्र आता भाजप गप्प बसणार नसून सोलापूर शहर आणि जिल्ह्याला त्वरित लस पुरवठा न झाल्यास  आपण कार्यकर्ते आणि नागरिकंासह रस्त्यावर उतरणार आहे, असा इशाराही आ. देशमुख यांनी दिला.

COMMENTS