गुंजेगाव उपक्रेंदाला अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर मंजूर आ. सुभाष देशमुखांनी केली होती मागणी सोलापूर : दक्षिण तालुक्यातील गुंजेगाव येथे 33-11 केव्ही उ
गुंजेगाव उपक्रेंदाला अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर मंजूर
आ. सुभाष देशमुखांनी केली होती मागणी
सोलापूर : दक्षिण तालुक्यातील गुंजेगाव येथे 33-11 केव्ही उपक्रेंदाला अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी आ. सुभाष देशमुख यांनी महावितरणकडे केली होती. ती मंजूर झाली असून त्यामुळे शेतकर्यांना आता सुरळीत वीज पुरवठा होणार आहे.
गुंजेगाव ते उळे येथे पूर्वी असलेल्या विद्युत उपकेंद्रातून सुरळीत वीज पुरवठा होत नव्हता. त्यामुळे या भागातील नागरिकांना आणि शेतकर्यांना त्रास होत होता. अखंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकर्यांना शेताला पाणी देताना अडचण येत होती. त्यांनी आ. देशमुख यांच्याशी संपर्क साधत याची माहिती दिली. आ. देशमुख यांनी तत्काळ महावितरणच्या अधीक्षक अभित्यांकडे येथे अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवून देण्याची मागणी केली होती. याबाबत पाठपुरावाही केला होता. अखेर महावितरणे ने गुंजेगाव येथे अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवण्यास मंजुरी दिली आहे. लवकरच हा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येत आहे. यामुळे येथील शेतकरी आणि नागरिकांची होत असलेली अडचण दूर होणार आहे.
COMMENTS