आ . सुभाष  देशमुख यांच्याकडून सारोळे कुटुंबीयांचे सांत्वन

आ . सुभाष देशमुख यांच्याकडून सारोळे कुटुंबीयांचे सांत्वन

आ . सुभाष देशमुख यांच्याकडून सारोळे कुटुंबीयांचे सांत्वन सोलापूर (प्रतिनिधी) ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील हनुमान नगर येथे राहणाऱ्या श

आ . सुभाष देशमुख यांच्याकडून सारोळे कुटुंबीयांचे सांत्वन

सोलापूर (प्रतिनिधी) ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील हनुमान नगर येथे राहणाऱ्या श्रीशैल गजानन सारोळे याचा दोन जून रोजी वीजेचा शॉक बसून मृत्यू झाला होता. आमदार सुभाष देशमुख यांनी सोमवारी  हनुमान नगरला भेट दिली व सारोळे कुटुंबियांचे सांत्वन केले.

मंद्रूप सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सूर्यकांत साठे यांनी घडलेली हकीकत सांगितली. गेल्या आठ महिन्यापासून हनुमाननगरचा सिंगल फेज वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. घटना घडली त्या दिवशी रात्री आठ ते पहाटे दोन या वेळेत वीजपुरवठा होणार होता. परंतु सकाळीही वीज सुरू होती. त्यामुळे दिनक्रम सोडून श्रीशैल हा मोबाईल चार्जिंग करण्यासाठी वस्तीवर गेला आणि त्या वेळी ही घटना घडली. फॉल्टी वीज पुरवठ्यामुळे ही आपत्ती ओढवली असल्याचे त्यांनी सांगितले.

सिंगल फेज वीजपुरवठा कायम राहिला असता तर ही वेळ आली नसती अशी कैफियतही मांडली. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार परिसरातील शेतकऱ्यांनी वस्तीवर मीटरने अधिकृत वीज कनेक्शनची मागणी केलेली आहे. त्यामुळे कनेक्शन वाढणार असल्याने सिंगल फेज वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी केली. त्यावर आमदार देशमुख यांनी याबाबत अधीक्षक अभियंता यांची भेट घेऊन प्रश्न सोडवला जाईल. तसेच सारोळे कुटुंबियांना कंपनीकडून नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत मिळविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे स्पष्ट केले.

यावेळी  राजकुमार सारोळे, मळसिद्ध मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले, माजी सरपंच विश्वनाथ स्वामी, ग्रामसेवक नागेश जोडमोटे, सुनील साठे, गजानन साठे, अमर साठे, अविनाश साठे, बालाजी सारोळे, दामाजी सारोळे, धनाजी साठे, बालाजी साठे, आप्पा साठे,अमोल सारोळे, बिटू साठे, प्रमोद माढे, मुकेश साठे, बाळासाहेब साठे, देविदास साठे उपस्थित होते.

COMMENTS