महाआघाडी सरकारकडून लोकांचे संसार उध्वस्त करण्याचे काम  आ. सुभाष देशमुख यांची जहरी टीका

महाआघाडी सरकारकडून लोकांचे संसार उध्वस्त करण्याचे काम आ. सुभाष देशमुख यांची जहरी टीका

महाआघाडी सरकारकडून लोकांचे संसार उध्वस्त करण्याचे काम आ. सुभाष देशमुख यांची जहरी टीका सोलापूर  : महाआघाडी सरकार सत्तेत आल्यापासून सर्वसामान्य लो

महाआघाडी सरकारकडून लोकांचे संसार उध्वस्त करण्याचे काम

आ. सुभाष देशमुख यांची जहरी टीका

सोलापूर  : महाआघाडी सरकार सत्तेत आल्यापासून सर्वसामान्य लोकांना आणि शेतकर्‍यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. अशातच आता किराणा दुकानात वाईन विक्रीस परवानगी देऊन या सरकारने लोकांचे संसार उध्वस्त करण्याचे काम केले आहे, अशी जहरी टीका आमदार सुभाष देशमुख यांनी केली.

आहेरवाडीतील दत्त मंदीर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मन की बात कार्यक्रम घेण्यात आला, त्यावेळी आ. देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष रामाप्पा चिवडशेट्टी होते. आ.देशमुख म्हणाले, मोदी सरकारने कोरोना काळात सर्वाधिक  मदत जनतेसाठी केली. कोरोना सुरू झाल्यापासून अन्नसुरक्षा योजनेद्वारे आतापर्यंत मोफत धान्यपुरवठा सुरू आहे.सर्व मदत केंद्र सरकारने केली. राज्याने फुटकी कवडी देखील दिली नाही.उलट शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करून  त्रास देणे सुरू आहे. महाआघाडी सरकार मद्यधुंद आहे की काय असे वाटते.आता किराणा दुकानात वाईन ठेवून लोकांचे संसार वाटोळे करण्याचे सरकार करत आहे.
बैठकीचे प्रास्ताविक ज्येष्ठ नेते हणमंत कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास पं स.सदस्य संदीप टेळे,अप्पासाहेब मोटे, दिपाली व्हनमाने, पंडीत पाटील, शशिकांत पाटील, सागर खांडेकर, नागनाथ बोरूटे, शेरा सावकार,किसन पवार,सुरेश मळेवाडी,माणिकराव देशमुख आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन अतुल गायकवाड यांनी तर आभार ईराप्पा बिराजदार यांनी मानले.

COMMENTS