आ. सुभाष देशमुख करणार नेतृत्वशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपच्या वतीने सोमवारी महावितरणवर मोर्चा

आ. सुभाष देशमुख करणार नेतृत्वशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपच्या वतीने सोमवारी महावितरणवर मोर्चा

सोलापूर (प्रतिनिधी) शेतकऱ्यांचे थकित वीजबिल उसदरातुन वसुल करण्यात येत आहे. त्याशिवाय अशा कठीण काळात महावितरण कडून वीज तोडणी सुरू आहे. या निषेधार्थ


सोलापूर (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांचे थकित वीजबिल उसदरातुन वसुल करण्यात येत आहे. त्याशिवाय अशा कठीण काळात महावितरण कडून वीज तोडणी सुरू आहे. या निषेधार्थ भाजपच्या वतीने आ. सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली
सोमवार, दिनांक 15 नोव्हेंबर रोजी महावितरणवरच्या जुनी मिल येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
आ. देशमुख म्हणाले की, गेल्या दोन वर्षात दोन वर्षात कोरोना, महापूर या सारख्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. असे असताना महावितरणकडून वीज बिल वसुली करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. आता तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर पाच जिल्ह्यातील  शेतकऱ्यांकडून थकित वीज बिल उसाच्या बिलातून वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा शेतकऱ्यांवर सरासर अन्याय आहे याचा निषेध म्हणून महावितरण वर भाजपच्या वतीने मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात शेतकऱ्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही आ. देशमुख यांनी केले आहे.

COMMENTS