आसरा येथील रेल्वे ब्रिज कामाचा प्रस्ताव तातडीने पाठवा आ. सुभाष देशमुख यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

आसरा येथील रेल्वे ब्रिज कामाचा प्रस्ताव तातडीने पाठवा आ. सुभाष देशमुख यांच्या अधिकाऱ्यांना सूचना सोलापूर : केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी या

आसरा येथील रेल्वे ब्रिज कामाचा प्रस्ताव तातडीने पाठवा

आ. सुभाष देशमुख यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

सोलापूर : केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी आसरा येथे रेल्वे ब्रिज मंजूर केला आहे त्या संदर्भात आमदार सुभाष देशमुख यांनी सोमवारी महापालिकेचे अधिकारी आणि नॅशनल हायवे भारत सरकार स्टेट हायवे महाराष्ट्र शासनच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेत आवश्यक त्या सूचना केल्या.

आसरा येथील पुलावर वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे आणि हा पूल अरुंद असल्यामुळे आमदार सुभाष देशमुख यांनी या पुलाची रुंदी वाढवण्याची आणि याला संमातर पूल करण्याची मागणी केली होती. वाहतूक मंत्री नितिन गडकरी सोलापूर दौऱ्यावर आले असता आ. देशमुख यांनी त्यांच्याकडे याबाबत मागणी केली होती ती मागणी गडकरी यांनी तात्काळ मंजूर केली. यानंतर सोमवारी आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिका अधिकारी आणि नॅशनल हायवे च्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ताबडतोब या मागणीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देत आणि हा पूल त्वरित करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीला नगर अभियंता संदीप कारंजे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS