अन्नपूर्णा योजनेतून आता सिव्हीलमध्ये मोफत डबे, लोकमंगल फाउंडेशनच्या उपकम्राचे सर्वत्र कौतूक

अन्नपूर्णा योजनेतून आता सिव्हीलमध्ये मोफत डबे लोकमंगल फाउंडेशनच्या उपकम्राचे सर्वत्र कौतूक सोलापूर (प्रतिनिधी) लोकमंगल फाउंडेशनच्या अन्नपूर्णा

अन्नपूर्णा योजनेतून आता सिव्हीलमध्ये मोफत डबे

लोकमंगल फाउंडेशनच्या उपकम्राचे सर्वत्र कौतूक

सोलापूर (प्रतिनिधी)
लोकमंगल फाउंडेशनच्या अन्नपूर्णा योजनेतून सोलापूर शहरातल्या 550 निराधार वृध्दांना दोन वेळच्या जेवणाचा डबा पुरवण्याच्या योजनेसोबतच आता नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार सोलापूरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये परगावाहून उपचारासाठी येणार्‍या रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत डबे पुरवले जात आहेत.
सोलापूरचे शासकीय रुग्णालय फार मोठे असून या रुग्णालयात सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातले तसेच लगतच्या उस्मानाबाद, बिदर, विजापूर, गुलबर्गा या जिल्ह्यातले लोकसुध्दा उपचारासाठी येतात. इतरत्र खासगी रुग्णालयातले उपचार त्यांना परवडत नाहीत. त्यामुळे त्यांना सरकारी दवाखान्याचा आधार घ्यावा लागतो.  रुग्णांच्या सोबत येणार्‍या त्यांच्या नातेवाईकांना सोलापुरात राहण्याची आणि जेवणाची सोय पैसे देऊन करावी लागते त्यामुळे त्यांचा खर्च वाढतो. म्हणून अशा लोकांना अन्नपूर्णा योजनेतून जेवणाचे डबे पुरवावेत, असा विचार लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक आ. सुभाष देशमुख यांनी बोलून दाखवला होता.  त्यानुसार सिव्हील हॉस्पिटलमध्ये रूग्णांच्या नातेवाईकांसाठीही डबे पुरवण्यात येत आहे. सध्या रोज 50-60 डब्यांची मागणी आहे. सिव्हील हॉस्पिटलमध्ये अन्नपूर्णा योजनेचा एक फलक लावला आहे.डब्याची मागणी करणार्‍यांसाठी फोन क्रमांक दिलेला आहे. त्यांच्या मागणीनुसार डबे तयार करून रिक्षातून पाठवले जातात. एकंदरीत सिव्हील हॉस्पिटलमधील आलेल्या रुग्णांचा कोणीही नातेवाईक उपाशी राहू नये असा प्रयत्न  लोकमंगल फाउंडेशनकडून होत आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS